फोटो सौजन्य - सोशल मीडिया
रोहित शर्माच्या मुलाचे नाव : भारतीय संघ सध्या कॅनबेरा येथे असून दोन दिवसीय सराव सामना खेळत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. आज या सामन्याचा दुसरा दिवस आहे. टीम इंडिया दुसऱ्या दिवशी पहिली गोलंदाजी करत आहे. संघाची यादी आली तेव्हा दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहितने सलामी देऊ नये असे संकेत मिळाले होते. भारताचा कर्णधार रोहित शर्मा सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला आहे. रोहित शर्माची बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना हुकला. त्याचे एकच कारण होते ते म्हणजेच तो दुसऱ्या बाप झाला आहे. पण तो आता दुसरा कसोटीची जोरदार तयारी करत आहे. त्याआधी आता रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे आणि यामध्ये तिने त्याच्या मुलाचे नाव रिव्हिल केले आहे.
क्रीडाच्या संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये गोंडस अवतारामध्ये परिवार आहे यामध्ये चार सदस्य आहेत म्हणजेच पुतळे आहेत. या पुतळ्यावर नाव लिहिलेली आहेत. यामध्ये रोहित शर्माचे नाव रो म्हणून लिहिले आहे तर त्याची पत्नी रितिकाचे नाव रिट्स असे लिहिले आहे. रोहित शर्माच्या मुलीचे नाव समाईरा असे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्या पुतळ्यावर सॅमी असे लिहिले आहे तर नुकताच रोहित शर्माचा नवजात मुलाचे नाव अहान असे ठेवले आहे. रितिका सजदेहने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
“Ahaan” is the name of Junior Rohit Sharma ❤️ pic.twitter.com/in71WMuHWA
— R A T N I S H (@LoyalSachinFan) December 1, 2024
अहान हे नाव भगवान विष्णूशी संबंधित मानले जाते. अहान हे अनेक अर्थ असलेले हिंदू नाव आहे. अहान हे नाव संस्कृत शब्द ‘अहा’ पासून आले आहे, ज्याचा अर्थ ‘जागवणे’ असा होतो. हे एक शक्तिशाली नाव आहे जे सूचित करते की त्याचा धारक नेहमीच त्यांच्या सभोवतालच्या जगाबद्दल जागरूक असेल आणि नेहमी शिकण्याचा आणि वाढण्याचा प्रयत्न करेल. याशिवाय पहाट, सूर्योदय, मॉर्निंग ग्लोरी, प्रकाशाचा पहिला किरण, जागरण, चैतन्य, जागृती हेही आहानचे समानार्थी शब्द आहेत.
भारताचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध सराव सामना खेळत आहे. यामध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील सुरु असलेल्या सामन्याचा पहिला दिवस वाया गेला आणि पहिल्या दिनाचा खेळ पावसामुळे रद्द करावा लागला होता. आजपासून या सामन्याला सुरुवात झाली आहे दोन्ही संघामध्ये ५०-५० ओव्हरचा खेळ होणार आहे.