फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना ६ डिसेंबरपासून सुरु आहे. भारताच्या संघाने पहिल्या कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली २९५ धावांनी विजय मिळवला आहे. यामध्ये भारताचा संघ कमालीची कामगिरी करून दाखवली. टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यांमध्ये फक्त गोलंदाजीमध्ये नाही तर फलंदाजीमध्ये सुद्धा उत्कृष्ट कामगिरी केली. भारताच्या संघाचे सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाचा घाम गाळला होता आणि कांगारूंसमोर पहिल्या विकेटची २०० हुन अधिक धावांची भागीदारी केली. भारताच्या संघाने पहिल्या कसोटीमध्ये चांगली सुरुवात केली नाही परंतु टीम इंडियाने पहिल्या इनिंगच्या गोलंदाजीमध्ये कमालीची गोलंदाजी करत खेळ सांभाळला होता.
क्रीडाच्या संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
रोहित शर्माला दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पर्थ येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भाग घेता आला नाही. त्याच्या अनुपस्थितीत, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचे नेतृत्व केले. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी दिनेश कार्तिकने ॲडलेडमध्ये भारतीय संघाचा कर्णधार कोण असेल हे सांगितले. बुमराहच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात धावांच्या बाबतीत सर्वात मोठा कसोटी विजय नोंदवला. यानंतर, बुमराहने भारतीय कसोटी संघाची जबाबदारी कायमस्वरूपी स्वीकारण्याची मागणी जोर धरू लागली आहे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अनेक चाहत्यांना असे वाटते की रोहितचे पुनरागमन झाले असले तरी, त्याने मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही संघाचे नेतृत्व करावे असे चाहत्यांचे म्हणणे आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 6 ते 10 डिसेंबर दरम्यान ॲडलेड ओव्हल येथे गुलाबी चेंडूने खेळवला जाणार आहे. क्रिकबझवरील कार्यक्रमादरम्यान, माजी भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकला गुलाबी चेंडूच्या कसोटीसाठी बुमराहला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याबद्दल त्याचे मत विचारण्यात आले. एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कार्तिकने बुमराहचे कौतुक केले आणि सांगितले की त्याने खूप चांगले काम केले आहे, परंतु रोहितला कर्णधार बनवण्यात आले आहे आणि तो परत आला आहे, त्यामुळे त्याने कर्णधार करावे.
उल्लेखनीय आहे की, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला 0-3 असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता, त्यानंतर रोहितच्या कर्णधारपदावर चाहत्यांनी आणि क्रीडा तज्ज्ञांनी जोरदार टीका केली होती. रोहितला त्याच्या कर्णधारपदाव्यतिरिक्त संपूर्ण मालिकेत त्याच्या फलंदाजीच्या कामगिरीबद्दलही खूप टीकेला सामोरे जावे लागले.
कालपासून म्हणजेच ३० नोव्हेंबरपासून भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सध्या सराव सामना खेळत आहे. कालपासून जरी सामना सुरु झाला असला तरी पावसामुळे कालचा खेळ रद्द करण्यात आला होता त्यामुळे आजपासून भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या संघासोबत खेळत आहे.