फोटो सौजन्य - Rajasthan Royals सोशल मीडिया
Rajasthan Royals vs Gujarat Titans match report : आजच्या सामन्यांमध्ये यशस्वी जैस्वाल त्याचबरोबर वैभव सूर्यवंशी या दोघांनी धुव्वादार खेळी खेळली आणि आजचा सामना एकतर्फी जिंकला. आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सला ८ विकेटने पराभूत केले आहे. या विजयासह राजस्थान रॉयल्सच्या प्लेऑफच्या आशा जिवंत राह्ल्या आहेत, आजच्या सामन्यात राजस्थानच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आजच्या सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांसमोर गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची एकही चालली नाही.
राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर वैभव सूर्यवंशी याने संघासाठी आज जयपूरच्या मैदानावर षटकार आणि चौकाराचा पाऊस पडला. त्याने आज ३५ चेंडूंमध्ये १०१ धावा केल्या आणि त्याने त्याचे आयपीएलमधील पहिले शतक पूर्ण केले. आज त्याने त्याच्या इनिंगमध्ये ११ षटकार मारले आणि ७ चौकार मारले. यशस्वी जैस्वालने देखील संघासाठी धुव्वादार खेळी खेळली. आज त्याने संघासाठी ४० चेंडूंमध्ये ७० नाबाद धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २ षटकार आणि ९ चौकार मारले. या दोघांनी आज पॉवर प्लेमध्ये सामना एकतर्फी केला आणि राजस्थान रॉयल्सच्या सईने वळवला.
Records broken. Match sealed 🩷
A night where a 14-year-old stole the show and #RR sealed a famous win over #GT 🤌
Scorecard ▶ https://t.co/HvqSuGgTlN#TATAIPL | #RRvGT | @rajasthanroyals pic.twitter.com/Cfhve73fO4
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2025
आजच्या सामन्यांमध्ये गुजरात टायटन्ससाठी आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या करीम जन्नत याला ६ चेंडूंमध्ये ३० धावा ठोकल्या. भारताचा चॅम्पियन आणि अनुभवी फलंदाज इशांत शर्मा याला ७ चेंडूंमध्ये २७ धावा ठोकल्या. वॉशिंग्टन सुंदर याला ४ चेंडूंमध्ये १६ धावा ठोकल्या. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान याने ९ चेंडूंमध्ये १३ धावा केल्या.
गुजरात टायटन्सच्या फलंदाजीचे सांगायचे झाले तर शुभमन गिल याने संघासाठी चांगली खेळी खेळली पण तो संघाला विजयापर्यत नेऊ शकला नाही त्याने आजच्या सामन्यात ५० चेंडूंमध्ये ८४ धावा केल्या तर जोस बॅटलर याने संघासाठी २६ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या. पण यशस्वी आणि युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी यांनी दोघांनीच पहिल्या चेंडूपासून धुव्वादार खेळी खेळली आणि संघाला विजय मिळवून दिला. आजच्या सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने आज पॉवर प्लेमध्ये सर्वात मोठी धावसंख्या उभारली. आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने ८७ धावा फक्त पॉवर प्लेमध्ये केल्या आहेत. वैभव सूर्यवंशी याने शतक झळकवल्यानंतर आज त्याच्या संपूर्ण संघाने त्यांच्यबरोबर सपोर्ट स्टाफने त्याचे उभे राहून कौतुक केले.