फोटो सौजन्य - KolkataKnightRiders सोशल मीडिया
आयपीएल २०२५ च्या १८ व्या सिझनची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामधील पहिल्या सामान्याने झाले. या सामन्यांमध्ये गतविजेत्या केकेआरला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसरा सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली. या सामन्यांमध्ये राजस्थानच्या गोलंदाजानाला हैदराबादच्या फलंदाजांनी झोडपवून काढलं होत. कोलकाता नाईट राइडर्सचा कर्णधार यंदा अजिंक्य रहाणे आहे तर . राजस्थान संघ त्यांच्या नियमित कर्णधाराशिवाय खेळत आहे. यावेळी राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद रियान परागकडे सोपवण्यात आले आहे.
गेल्या सामन्यात संजू सॅमसन एक प्रभावी खेळाडू म्हणून मैदानात आला होता आणि तो या सामन्यातही तीच भूमिका बजावू शकतो. राजस्थान आणि केकेआर हे दोन्ही संघ सध्या आयपीएल २०२५ मध्ये पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. दोन्ही संघांच्या समोरासमोरील सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, आयपीएलमध्ये आतापर्यंत राजस्थान आणि केकेआर यांच्यात एकूण २९ सामने झाले आहेत ज्यात दोन्ही संघांनी १४-१४ सामने जिंकले आहेत, तर एक सामना अनिर्णीत राहिला. या हंगामात राजस्थान आणि कोलकाता संघांना त्यांच्या पहिल्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात आक्रमकता दाखवता आली नाही. दोन्ही संघ आता पुनरागमन करू इच्छितात.
Under the lights, away from home — our first away challenge on the road! ⚔️ 🔥 pic.twitter.com/bcED1K17F2
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 26, 2025
दोघांनीही अद्याप विजयाचे खाते उघडलेले नाही, परंतु कागदावर केकेआरचा वरचष्मा असल्याचे दिसते. राजस्थानचा प्रभारी कर्णधार रियान परागचीही कसोटी लागेल कारण तो पहिल्या सामन्यात काही निर्णय घेताना अनिर्णयशील दिसला. राजस्थानसाठी, नियमित कर्णधार सॅमसन एक प्रभावी खेळाडू म्हणून आला आणि त्याने चांगली फलंदाजी केली आणि संघाला सामन्यात टिकवून ठेवले, परंतु राजस्थानचा संघ हे मोठे लक्ष्य गाठू शकला नाही. आता या दोन्ही संघाच्या प्लेइंग ११ वर एकदा नजर टाका त्याचबरोबर तुम्ही तुमच्या ड्रीम ११ टीम तयार करताना कोणत्या खेळाडूंना निवडाल तुमची ड्रीम टीम कशी असू शकते हे जाणून घ्या.
रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), यशस्वी जयस्वाल, शिमरॉन हेटमायर, नितीश राणा, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, महिष तीक्षना, फजलहक फारुकी,
संजू सॅमसन (इम्पॅक्ट प्लेअर)
अजिंक्य रहाणे (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, सुनील नारायण, वैभव अरोरा/अंगकृष रघुवंशी, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, स्पेन्सर जॉन्सन
ड्रीम११ फॅन्टसी सजेशन : संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, क्विंटन डी कॉक, अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, यशस्वी जयस्वाल, सुनील नरेन, आंद्रे रसेल, रियान पराग, तुषार देशपांडे, वरुण चक्रवर्ती
कर्णधार – अजिंक्य रहाणे, उपकर्णधार – संजू सॅमसन