फोटो सौजन्य - IndianPremierLeague
IPL 2025 : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वाढलेल्या वातावरणामुळे आयपीएल 10 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली होती. आता आयपीएल 2025 चा दुसऱ्यांदा शुभारंभ झाला आहे. कालपासुन सामना सुरु झाला पण कालच्या सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आज 18 मे रोजी दोन सामने खेळवले जात आहेत. यामध्ये पहिला सामना हा पंजाब किंग्स विरूद्ध राजस्थान राॅयल्स यांच्यामध्ये सुरु आहे. यामुळे, आजचा म्हणजेच राजस्थान विरुद्ध पंजाब किंग्ज सामना हा पहिला सामना होता, जो आयपीएल २०२५ च्या निलंबनानंतर खेळवला जात आहे.
या सामन्यात पंजाब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात नाणेफेक झाल्यानंतर, राष्ट्रगीतापूर्वी, दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आणि चाहत्यांनी भारतीय सैन्याला विशेष श्रद्धांजली वाहिली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. खेळाडू आणि चाहत्यांनी भारतीय सैन्याच्या वृत्तीला सलाम केला, ज्यामुळे युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काही दिवसांतच लीग पुन्हा सुरू करणे शक्य झाले.
Grateful to the Armed Forces.
Jai Hind 🇮🇳#TATAIPL | #RRvPBKS pic.twitter.com/OOid23RDuZ
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025
राजस्थान विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यापूर्वी, भारतीय सशस्त्र दलांच्या सन्मानार्थ राष्ट्रगीत वाजवण्यात आले. ८ मे च्या रात्री, १०.१ षटकांत पंजाबचा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ९ मे रोजी धर्मशाला येथे सुरू असलेल्या सामन्यापासून सुमारे १०० किमी अंतरावर पाकिस्तानकडून हवाई हल्ला झाल्यानंतर आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले.
आता पुन्हा एकदा आयपीएल २०२५ सुरू झाल्यानंतर, राजस्थान-पंजाब सामन्यात राष्ट्रगीताच्या वेळी चाहते आणि खेळाडू भारतीय सैन्याला सलाम करताना दिसले. तुषार देशपांडे यांचे फोटो चाहत्यांची मने वेगाने जिंकत आहेत. प्रियांशची विकेट घेताच तुषार त्याला सॅल्यूट करताना दिसतो. आजच्या सामन्यांमध्ये पंजाबच्या संघाने विकेट्स गमावले पण प्रत्येक फलंदाजाने स्फोटक फलंदाजी केली. आणि त्यामुळे संघ मोठी धावसंख्या उभी करण्यात यशस्वी ठरला.
नेहलने एका टोकाला धरून उत्तम फलंदाजी करत केवळ २५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. आपल्या खेळीदरम्यान, नेहलने राजस्थानच्या प्रत्येक गोलंदाजाला लक्ष्य केले आणि मैदानाच्या कानाकोपऱ्यात शक्तिशाली फटके मारले. नेहल ३७ चेंडूत ७० धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ५ षटकार मारले.