IPL 2025: Vaibhav Suryavanshi created a storm! RR management was also impressed, in just 6 balls.. Watch the video
IPL 2025 : आयपीएल २०२५ चा १८ हंगाम चांगल्या रंगात आला असून सुरवात मोठ्या दणक्यात झाली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत २२ सामने खेळण्यात आले आहेत. गुणतालिकेतही आता मोठी चढाओढ दिसायला लागली आहे. राजस्थान रॉयल्ससाठी हा हंगाम संमिश्र असा राहील आहे. राजस्थानने आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय प्राप्त केला आहे. यासह, राजस्थान संघ गुणतालिकेत ७ व्या स्थानावर आहे. आयपीएल लिलावापासून राजस्थान रॉयल्स चर्चेत राहिला आहे. कारण, आरआरने १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीवर १.१० कोटी रुपयांची बोली लावली होती.
राजस्थान रॉयल्सने वैभवला १.१० कोटी रुपयांना संघात समाविष्ट केले आहे. वैभवला पहिल्या चार सामन्यांमध्ये अद्याप खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण हा तरुण फलंदाज राजस्थान रॉयल्स व्यवस्थापनाला प्रभावित करण्यासाठी कुठेच कमी पडताना दिसत नाहीये. गुजरात जायंट्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी वैभवने दमदार खेळी करत व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. बिहारच्या या फलंदाजाने ४०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा कुटल्या आहेत. त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
हेही वाचा : KKR vs LSG : Wd, Wd, Wd…, शार्दुल ठाकूरच्या नावे नकोसा विक्रम, असा करणारा ठरला पहिलाच गोलंदाज..
वैभव सूर्यवंशीने नेट सेशनमध्ये एका षटकात २७ धावा काढल्या आहेत. षटकाच्या पहिल्या चेंडूवर वैभवने १ धाव घेत आपले खाते उघडले. त्यानंतर त्याने पुढच्या दोन चेंडूंवर चौकार लगावले. वैभवने पहिल्या तीन चेंडूंवर ९ धावा वसूल केल्या. त्यानंतर वैभवने सलग तीन चेंडूंवर तीन षटकार लगावात सगळ्यांना आश्चर्यचकित केले. वैभवने एका षटकात तीन षटकार, दोन चौकार आणि एका एकेरीच्या मदतीने २७ धावा काढल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट ४०० पेक्षा जास्त असल्याचे दिसून आले.
Sorry guys 😂 pic.twitter.com/MeOAEezhYD
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 7, 2025
वैभव सूर्यवंशी हा लिलावाच्या काळापासूनच चर्चेत आला आहे. जेव्हा राजस्थान रॉयल्सकडून त्याच्यावर १ कोटी १० लाख रुपयांची बोली लावली. या दरम्यान, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये स्पर्धा रंगली होती. पण शेवटी राजस्थान रॉयल्सने बाजी मारली. १३ वर्षांच्या या खेळाडूला १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळणे ही खरच खूप मोठी गोष्ट मानली जात आहे.
हेही वाचा : CSK vs PBKS :त्याने CSK वर कहर बरसला! ३९ चेंडूत शतक ठोकणारा प्रियांश कोण? ६ सिक्सरचाही केलाय कारनामा..
आयपीएल २०२५ ची सुरवात आरआरसाठी निराशाजनक राहिली. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभव पत्करावा लागला. तसेच पुढच्या सामन्यात कोलकाताने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून या हंगामात पहिला जय मिळवला. तर त्यांच्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा ५० धावांनी धुव्वा उडवला. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत ४ सामने खेळले असून ज्यामध्ये त्यांनी २ सामने जिंकले आहेत.