फोटो सौजन्य : Proteas Men
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा काल तिसरा दिवस पार पडला या तिसऱ्या दिनी आता चौथ्या डावाला कालपासून सुरुवात झाली आहे. कालच्या सामन्यात मिचेल स्टार्क याच्या फलंदाजीने सर्वांना चकित केले. त्याने ऑस्ट्रेलियन संघासाठी अर्धशतक झळकावले आणि संघासाठी मोठे लक्ष उभे करण्यात यश मिळवले. स्टार्क याने संघासाठी 58 धावांची खेळ खेळले त्याचबरोबर त्याने संघासाठी सर्वात उत्तम कामगिरी देखील केली. तर दक्षिण आफ्रिकेसाठी एडन मार्करम यांनी देखील शतक झळकावले. त्याला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा याची साथ मिळाली. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यामध्ये तिसरा दिनी झालेल्या खेळाचा अहवाल आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या दिनी तिसऱ्या डावांमध्ये फलंदाजी करत असताना आठ विकेट्स गमावले होते त्यानंतर स्टार्क याने संघासाठी कमालीची खेळी खेळली आणि अर्धशतक झळकावले त्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर 282 धावांचे लक्ष उभे केले होते. स्टार्क याने 58 धावा केल्या यामध्ये त्यांनी पाच चौकार मारले. त्याचबरोबर अलेक्स कॅरीने देखील 43 धावांची खेळी खेळली याव्यतिरिक्त एकही ऑस्ट्रेलियन फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही.
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर एडन मार्करम आणि तिसऱ्या दिनी कहर केला. दक्षिण आफ्रिकेसमोर 282 धावांचे लक्ष असताना एडन मार्करम हा संघासाठी मैदानात पहिल्या चेंडूपासून उभा राहिला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिला विकेट लवकर गमावला होता त्यानंतर वेब मुल्डर आणि एडनमार्क्रम या दोघांची भागीदारी पाहायला मिळाली. त्याचबरोबर त्यानंतर बिल्डर आऊट झाल्यानंतर टेंबा बवुमा याने देखील कमालीची कामगिरी केली आहे. एडन मार्करम याने तिसऱ्या दिनाच्या समाप्तीनंतर चौथ्या डावांमध्ये 102 धावांची खेळी खेळले आहे अजूनही तो नाबाद आहे. त्याला यामध्ये 11 षटकार मारले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा पायात दुखापत असताना चांगले कामगिरी केली आहे. टेंबा बवुमा याने संघासाठी ६५ धावांची खेळी तिसऱ्या दिनाच्या समाप्तीनंतर खेळली आहे.
A phenomenal day for the Proteas, an outstanding all-round performance! 💪🔥
They closed out Day 3 on 213/2, just 69 runs away from securing the World Test Championship Mace. 🏆🇿🇦
Dominant with the ball, composed and clinical with the bat. South Africa stands on the brink of… pic.twitter.com/ExaeuwQXrX
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 13, 2025
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर ऑस्ट्रेलियन संघाने चौथा डावांमध्ये फक्त दोन विकेट्स घेतले आहेत. हे दोन्हीही विकेट मिचेल स्टार्क याने घेतले आहेत. तिसरा दिवसाच्या समातीनंतर आता फक्त दक्षिण आफ्रिकेला 69 धावांची गरज आहे. या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पूर्ण केल्यास दक्षिण आफ्रिकेचा संघ हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने शेवटच्या ट्रॉफी ही 1998 रोजी जिंकली होती त्यानंतर त्यांनी एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नव्हती तब्बल 27 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचे भाग्य उघडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.