Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SA vs ENG : जो रूटचा आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये डंका! इंग्लंडकडून केला भीम पराक्रम;  इऑन मॉर्गनचा ‘तो’ विक्रम मोडला 

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला. असे असले तरी इंग्लंडच्या जो रूटने मोठा विक्रम केला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 05, 2025 | 02:57 PM
SA vs ENG: Joe Root now has a chance in ODI cricket! England's Bhima feat; Breaks Eoin Morgan's 'that' record

SA vs ENG: Joe Root now has a chance in ODI cricket! England's Bhima feat; Breaks Eoin Morgan's 'that' record

Follow Us
Close
Follow Us:

Joe Root has scored the most ODI half-centuries for England : दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा महान फलंदाज जो रूटने मोठा भीम पराक्रम केला आहे. तो आता इंग्लंडकडून सर्वाधिक अर्धशतकं लगावणारा फलंदाज ठरला आहे. तथापि, इंग्लंडने लॉर्ड्सच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामना गमावला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा ५ धावांनी पराभव केला आहे.  इंग्लंडला विजयासाठी ३३१ धावांचे लक्ष्य होते, परंतु, त्यांचा संघ ३२५ धावाच करू शकला. जो रूटने या सामन्यात ६१ धावा करून एक विक्रम केला आहे.

हेही वाचा : Asia Cup 2025 : भारताचा संघ आशिया कपसाठी दुबईला रवाना! सुर्या-हार्दिक दिसले डॅशिंग लूकमध्ये…

जो रूटकडून इऑन मॉर्गनचा विक्रम उद्ध्वस्त

जो रूटने नंद्रे बर्गरच्या चेंडूवर एक धाव घेऊन आपले अर्धशतक पूर्ण केले, यासोबतच त्याने इंग्लंडसाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक अर्धशतके ठोकण्याचा विरकं स्वताच्या नावावर केला. त्याने या कामगिरीसह आपला देशबांधव इऑन मॉर्गनला पिछाडीवर टाकले आहे. मॉर्गनने २२५ सामन्यांमध्ये ४२ अर्धशतके झळकवली आहेत. तर जो रूटचे हे ४३ वे एकदिवसीय अर्धशतक ठरले. जो रूटने इंग्लंडकडून खेळताना १८२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४८.९८ च्या सरासरीने ७२०१ धावा काढल्या आहेत. यामध्ये त्याने १८ शतके आणि ४३ अर्धशतकं लागावळी आहेत.

इंग्लंडने मालिका गमावली

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना गमावणाऱ्या इंग्लंडने दूसरा देखील सामना गामवाला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने ८ गडी गमावून ३३० धावांचा डोंगर उभारला.  दक्षिण आफ्रिकेकडून मार्कराम ४९, मॅथ्यू ब्रीट्झके ८५, स्टब्सने ५८,  तर डेवाल्ड ब्रेव्हिसने ४२ धावा केल्या. तर धावांचा पाठलाग करणारा इंग्लंड संघ मात्र संघ निर्धारित षटकांमध्ये ९ गडी गमावून केवळ ३२५ धावाच करू शकला. इंग्लंड संघाकडून जोस बटलर आणि जो रूट यांनी प्रत्येकी ६१ धावा केल्या, तर जेकब बेथेलने ५८ धावांची खेळी साकारली, परंतु या फलंदाजांना आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले.दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गरने तीन विकेट घेतल्या. केशव महाराजांना दोन यश मिळाले. तीन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने २-० अशी मालिका जिंकून मोठे यश मिळवले.

हेही वाचा : Women’s ODI World Cup 2025 : महिला विश्वचषक आता स्टेडियममध्ये पाहणं झालं सोपं, फक्त 100 रुपयात बुक करा तिकीट! वाचा सविस्तर माहिती

 

Web Title: Sa vs eng joe root breaks eoin morgans record scores most half centuries for england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • Joe Root

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.