
Joe Root काय ऐकत नाही! शतकासह ब्रायन लाराचा रेकॉर्ड मोडला (Photo Credit- X)
🚨 ODI HUNDRED #20 FOR JOE ROOT! 🚨 pic.twitter.com/i9nfxljmor — England Cricket (@englandcricket) January 27, 2026
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा इंग्लंडचा निर्णय सुरुवातीला चुकला की काय असे वाटत होते. सलामीवीर बेन डकेट (७ धावा) आणि रेहान अहमद (२४ धावा) लवकर बाद झाल्यामुळे इंग्लंडची अवस्था २ बाद ४० अशी बिकट झाली होती. मात्र, अनुभवी जो रूटने जेकब बेथेलच्या साथीने डावाची सूत्रे हाती घेतली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत इंग्लंडचा डळमळीत झालेला डाव सावरला. बेथेल ६५ धावा करून बाद झाला, पण रूटने एका बाजूने खिंड लढवत आपले शतक पूर्ण केले.
या शतकासह जो रूटने ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिजचे महान फलंदाज ब्रायन लारा यांना मागे टाकले आहे. ब्रायन लारा यांच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १९ शतके होती, आता रूटच्या नावावर २० शतके झाली आहेत. या मालिकेत रूटचे सातत्य वाखाणण्याजोगे असून त्याने पहिल्या सामन्यात ६२ आणि दुसऱ्या सामन्यात ७५ धावांची खेळी केली होती.
शतकासोबतच जो रूटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या ७,५०० धावा देखील पूर्ण केल्या. ही कामगिरी करताना त्याने भारताच्या दोन महान कर्णधारांना मागे टाकले आहे. ७,५०० धावांचा टप्पा गाठणारा तो जगातील चौथा सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे.
जो रूट: १७८ डाव (७,५०० धावा)
सौरव गांगुली: १८५ डाव
रोहित शर्मा: १८८ डाव
या विक्रमावरून जो रूट सध्या किती जबरदस्त फॉर्ममध्ये आहे याची प्रचिती येते. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भक्कम धावसंख्या उभारली असून, क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा त्याच्या नावाची चर्चा रंगली आहे.