फोटो सौजन्य – X (FanCode)
दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ चा दुसरा सामना १९ जुलै रोजी दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स विरुद्ध वेस्ट इंडिज चॅम्पियन्स यांच्यात खेळला गेला. सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमधून नाही तर बॉल आउट नियमानुसार लागला. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी केली , ज्याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने सामना अनिर्णित राखला . त्यानंतर नियमांनुसार, पंचांनी सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी बॉल आउट करण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये आफ्रिकेने विजय मिळवला आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला.
पावसामुळे सामना ११-११ षटकांचा खेळवण्यात आला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना ११ षटकांत ५ गडी गमावून ७९ धावा केल्या. वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. सलामीवीर म्हणून ख्रिस गेलने ६ चेंडूत २ धावा केल्या. तर ड्वेन स्मिथ ११ चेंडूत ७ धावा काढून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या लेंडल सिमन्सने २१ चेंडूत २८ धावांची खेळी केली. त्याने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर असलेल्या किरॉन पोलार्डला आपले खातेही उघडता आले नाही. तो गोल्डन डकवर बाद झाला.
Bowl-Out Decides SA vs WI Thriller 🍿
You can’t write this drama! After the match ended in a tie, South Africa Champions edge out the Windies Champions 2-0 in a tense bowl-out 🎯#WCL2025 pic.twitter.com/lemLX9R0Ac
— FanCode (@FanCode) July 19, 2025
लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने धावसंख्या बरोबरीत आणली. संघाकडून सरेल एर्वीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने १८ चेंडूत २७ धावा केल्या. याशिवाय जेपी ड्युमिनीने १२ चेंडूत २५ धावांची महत्त्वाची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेने बॉल आउट नियमानुसार सामना जिंकला . बॉल आउटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी ५ पैकी २ वेळा स्टंप मारले , तर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी एकदाही स्टंप आउट केला नाही. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला .
शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी ९ धावांची आवश्यकता होती. जेपी ड्युमिनी आणि स्मट्स क्रीजवर होते. पहिल्या तीन चेंडूंवर ७ धावा काढल्या गेल्या. तीन चेंडूंवर दोन धावा काढल्या गेल्या. चौथ्या चेंडूवर स्मट्स क्लीन बोल्ड झाला. पाचव्या चेंडूवर एडवर्ड्सने मॉर्न व्हॅनला झेलबाद केले. शेवटच्या चेंडूवर लेग बाय म्हणून एक धाव काढली गेली. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.
आता वेस्ट इंडिज चॅम्पियन्सना पाचपैकी तीन हिट्सची आवश्यकता होती, फिडेल एडवर्ड्स पहिला हिट चुकला. शेल्डन कॉट्रेलचाही दुसरा हिट चुकला. अॅशले नर्सचाही तिसरा प्रयत्न चुकला. ड्वेन ब्राव्होलाही हिट करता आला नाही आणि दक्षिण आफ्रिकेने बॉल आउटद्वारे सामना जिंकला.