The God of Cricket now has a new responsibility! Sachin Tendulkar appointed as Reddit's brand ambassador..
Reddit appoints Sachin Tendulkar as brand ambassador: सचिन तेंडुलकर त्याच्या क्रिकेटमधील योगदानाने सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्याला क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन कित्येक काळ उलटून गेला आहे. तरी देखील त्याचे महत्व तसूभर देखील कमी झालेले नाही. तो नेहमी चर्चेत असतो. आता देखील सचिन तेंडुलकर पुन्हा चर्चेत आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या रेडिटने बुधवारी, १८ जून रोजी भारतीय क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरला आपला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले. याबाबत रेडिटने म्हटले आहे की, “आम्ही घोषणा करत आहोत की ‘गॉड ऑफ क्रिकेट’ सचिन तेंडुलकर नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून रेडिटशी सामील झाले आहे.”
या महिन्याच्या सुरूवातीला क्रीडा चाहत्यांना चाहत्यांद्वारे संचालित सचिन तेंडुलकरसह रेडिट समुदायांमध्ये भारताचा दिग्गज क्रिकेट खेळाडू तेंडुलकर यांच्याशी संवाद साधण्याची विशेष संधी मिळणार आहे. त्यांच्या ऑफिशियल रेडिट प्रोफाइलच्या माध्यमातून दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर वैयक्तिक माहिती, सामन्याबाबत माहिती आणि विशेष कन्टेन्ट शेअर करणार आहे. आगामी महिन्यांमध्ये तेंडुलकर भारतातील, तसेच जगभरातील इतर बाजारपेठांमधील रेडिटसाठी नवीन मार्केटिंग मोहिमेमध्ये दिसून येणार आहे.
सचिन म्हणाला की, ”माझ्यासाठी क्रिकेट नेहमी मैदानावर व मैदानाबाहेर व्यक्तींसोबत असलेल्या खास नात्याबाबत आहे. रेडिटबाबत जाणून घेतल्यानंतर त्यांच्याबाबत खास बाब म्हणजे समुदायांना एकत्र आणणारी आवड,” असे सचिन तेंडुलकरने स्पष्ट केले. सचिन पुढे म्हणाला की, ”मी विशेषत: आर/इंडियाक्रिकेट और आर/इंडियनस्पोर्ट्सवरील संवाद जाणून घेण्यास उत्सुक आहे. हा अद्वितीय प्लॅटफॉर्म आहे, जेथे व्यक्ती त्यांना आवडणाऱ्या गोष्टी शेअर करतात. या सहयोगाने मला चाहत्यांशी नवीन पद्धतीने कनेक्ट होण्याची आणि खेळाप्रती आमच्या समान प्रेमाला साजरे करण्याची संधी दिली आहे.”
”क्रिकेट जगतातील महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांच्यामध्ये मर्यादांना दूर करण्याची आणि त्यांच्या असाधारण टॅलेंटच्या माध्यमातून व्यक्तींना एकत्र आणण्याची उल्लेखनीय क्षमता आहे. मैदानावर त्यांच्या उपस्थितीने चाहत्यांमध्ये प्रबळ सामुदायिक भावना जागृत केली, जे ‘मास्टर ब्लास्टर’साठी समान कौतुकासह एकत्र आले,” असे रेडिटच्या इंटरनॅशनल ग्रोथचे उपाध्यक्ष दुर्गेश कौशिक म्हणाले.
हेही वाचा : IND Vs ENG : भारत-इंग्लंड मालिकेत ‘पतौडी’ नावाने मिळणार पदक, विजेत्या संघाच्या कर्णधाराचा होईल सन्मान..
सचिनने २०० कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा (१५९२१ धावा) आणि शतके (५१शतके) करण्याचा विक्रम केला आहे. तसेच ४६३ एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये देखील सर्वाधिक धावा (18,426 धावा) आणि शतके (४९ शतके) करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० शतके करणारा तो एकमेव फलंदाज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक (२०० धावा) करणारा तो पहिला फलंदाज आहे. सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट करकीर्दीबद्दलक्रिकेट व त्यापलीकडे योगदानासाठी त्यांना भारतरत्न (भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार), पद्म विभुषण, पद्मश्री, राजीव गांधी खेळ रत्न, लॉरेस स्पोर्टींग मोमेण्ट अवॉर्ड यांसह इतर पुरस्कारांसह सन्मानित करण्यात आले आहे.