विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिकेला २० जूनपासून सुरवात होत आहे. या दौऱ्यात युवा फलंदाज शुभमन गिल पहिल्यांदाच टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर संघाची धुरा शुभमन गिलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्याच वेळी, या दौऱ्यावर ऋषभ पंतला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर लागोपाठ भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
हेही वाचा : IND Vs ENG : भारत-इंग्लंड मालिकेत ‘पतौडी’ नावाने मिळणार पदक, विजेत्या संघाच्या कर्णधाराचा होईल सन्मान..
इंग्लंडच्या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी दोन्ही दिग्गज फलंदाजांची निवृत्ती ही भारतासाठी धक्कादायक मानली जात आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंडला पोहोचला आहे. संपूर्ण संघ तिथे जोरदार सराव करत असल्याचे दिसत आहे. त्यांनी तेथे आंतर-संघात सामने देखील खेळले आहेत. यावेळी कसोटीचा माजी कर्णधार विराट कोहली देखील कुटुंबासह लंडनमध्ये वेळ घालवत आहे. कोहली आयपीएल खेळल्यानंतर लंडनला गेला आहे.
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून देखील विराट कोहली इंग्लंड मालिकेवर लक्ष देऊन आहे. रेव्हस्पोर्ट्झच्या एका व्हिडिओ रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, त्याने लीड्समधील पहिल्या कसोटी सामन्याच्या काही दिवस आधी नवीन कसोटी कर्णधार शुभमन गिल, उपकर्णधार ऋषभ पंत आणि संघातील इतर काही खेळाडूंना लंडनमधील त्याच्या घरी बोलवण्यात आले होते. सोमवारी केंटमध्ये संघातील अंतर्गत सामना संपल्यानंतर संघाला एक दिवस सुट्टी होती, त्यामुळे संघातील खेळाडूंना विराट कोहलीला भेटण्यासाठी वेळ उपलब्ध होता.
हेही वाचा : SL vs BNG : बांगलादेशच्या कर्णधाराचा शतकी तडाखा! Nazmul Hasan Shanto ने श्रीलंकेला झुलवले, पहिल्यांदाच केला ‘हा’ भीम पराक्रम..
ही बैठक कशाबद्दल होती या बद्दल मात्र अहवालात काही एक संगण्यात आलेले नाही. असा अंदाज लावला जात आहे की या काळात आगामी मालिकेबद्दल किंवा गिल आणि पंत तरुण संघाचे नेतृत्व कसे करतील याबद्दल चर्चा करण्यात आली आसावी असे मानले जात आहे. तथापि, ही बैठक तब्बल दोन तास चालल्याची माहिती मिळत आहे.
आयसीसीकडून महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १६ जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने हे वेळापत्रक जाहीर करतान म्हटले आहे की, ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत, पाकिस्तान महिला क्रिकेट संघ हायब्रिड मॉडेलवर खेळताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. महिला विश्वचषक २०२५ ला यावर्षी ३० सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. स्पर्धेचा सेमीफायनल सामना २० किंवा ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. अंतिम सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास तो २ तारखेला खेळवण्यात येणार आहे. यासाठी दोन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. पहिला कोलंबो आणि दुसरा बेंगळुरू येथे हा सामना होऊ शकतो.