Arjun-Sania Engagement: 'Yes, it's an engagement', Sachin Tendulkar finally confirmed Arjun-Sania's relationship..
Arjun-Sania Engagement : भारताचा महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपला मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याबाबत माहिती दिली आहे. आखेर सचिन तेंडुलकरने अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांच्या साखरपुड्याची कबुली दिली आहे. सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. परंतु सचिन आणि त्याचे कुटुंब यावर कोणतीच अधिकृत कबुली दिली नव्हती. आता स्वतःच क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने यावर मौन सोडले असून साखरपुडा झाला असल्याचे सांगितले. मागील बुधवारी १३ ऑगस्ट २०२५ रोजी अर्जुन आणि सनिया यांनी एकमेकांना साखरपुड्याच्या अंगठ्या घातल्या होत्या. त्यानंतर सोशल मिडियावर या दोघांबाबत खुपच चर्चा रंगली होती .
हेही वाचा : Asia Cup 2025 : आशिया कपसाठी ओमान क्रिकेट संघ जाहीर! जतिंदर सिंहची कर्णधारपदी वर्णी
सचिन तेंडुलकरकडून रेडिट सत्रात अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याबाबत कबुली दिली आहे. रेडिटच्या ‘आस्क मी एनीथिंग’ सत्रादरम्यान सचिनला याबद्दल विचारण्यात आले. तेव्हा सचिन तेंडुलकरने हसत उत्तर देत म्हटले की, ‘हो, तो साखरपुडा झाला आहे आणि आम्ही सर्वजण या नवीन प्रवासाबद्दल खूप जास्त आनंदी आणि उत्साहित आहोत.’ सानिया चांडोक ही देशातील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात असून घई कुटुंब पंचतारांकित इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी सारख्या व्यवसायांमध्ये सक्रिय आहेत. आरोग्यासाठी अनुकूल आईस्क्रीम आणि फ्रोझन डेझर्ट ब्रँडसारख्या वस्तू बनवण्यात प्रसिद्ध आहेत.
सानिया ही प्रसिद्ध कुटुंबातली आहे. सानियाने स्वतःच्या करियरचा मार्ग निवडला आहे. सानिया चांडोक सध्या आर्थिक राजधानी मुंबईतील प्रीमियम पेट सलून, स्पा आणि स्टोअर मिस्टर पॉजची संस्थापकअ सल्याची माहिती आहे.
सानिया चांडोकने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी मिळवली आहे. ती अर्जुन तेंडुलकरची बहीण सारा तेंडुलकरची खूप खास मैत्रीण आहे. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर एकत्र दिसून आले आहेत.
हेही वाचा : रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला अलविदा का म्हटले? हिटमॅनने केला मोठा खुलासा..
अर्जुन तेंडुलकरचे वय २५ वर्ष आहे. अर्जुन हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोवा संघाकडून खेळतो. याशिवाय, तो इंडियन प्रीमियर लीग मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग आहे. मात्र, त्याला आयपीएल २०२५ च्या हंगामात अंतिम ११ मध्ये संधी देण्यात आली नाही.