Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saina Nehwal Divorce: अचानक 7 वर्षाने सायना नेहवाल – पारूपल्ली कश्यप झाले वेगळे, घटस्फोटाच्या बातमीने खळबळ

भारताच्या दोन माजी नंबर-१ बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी २०१८ मध्ये लग्न केले.मात्र आता अचानक घटस्फोटाच्या बातमीने क्रीडा विश्वास खळबळ उडवली आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 14, 2025 | 05:29 AM
सायना नेहवाल आणि पारूपल्ली कश्यपचा घटस्फोट (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

सायना नेहवाल आणि पारूपल्ली कश्यपचा घटस्फोट (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

भारताची अनुभवी बॅडमिंटन स्टार आणि ऑलिंपिक पदक विजेती सायना नेहवालने तिच्या निर्णयाने सर्वांना धक्का दिला आहे. माजी जागतिक नंबर-१ बॅडमिंटन स्टार सायना आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. सायनाने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती शेअर करून देशभरातील बॅडमिंटन चाहत्यांना धक्का दिला आहे. सायना आणि भारताचा माजी नंबर-१ पुरुष बॅडमिंटन स्टार पारुपल्ली कश्यप यांनी दीर्घ नात्यानंतर २०१८ मध्ये लग्न केले. आता ७ वर्षांनंतर दोघांचेही हे नाते तुटले आहे. या निर्णयाने सर्वांना नक्कीच धक्का बसला आहे. 

आम्ही शांतता निवडत आहोत – सायना 

३५ वर्षीय अनुभवी भारतीय स्टार सायनाने रविवारी, १३ जुलै रोजी रात्री उशिरा इंस्टाग्रामवर पोस्ट करून ही घोषणा केली, ज्यामुळे या जोडप्याच्या लाखो चाहत्यांची मने तुटली. सायनाने तिच्या निवेदनात म्हटले आहे की, “आयुष्य कधीकधी आपल्याला वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाते. खूप विचार केल्यानंतर, पारुपल्ली कश्यप आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघेही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांती, प्रगती निवडत आहोत आणि सावरत आहोत”

त्यांच्या वेगळे होण्याचे खरे कारण अद्याप कळलेले नसले तरी, सायनाने कश्यपसोबत घालवलेल्या क्षणांबद्दल आनंद व्यक्त केला. सायनाने लिहिले की, “या आठवणींसाठी मी नेहमीच कृतज्ञ आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे. अशा वेळी आमच्या गोपनीयतेला समजून घेतल्याबद्दल आणि त्यांचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.” असेही तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

IND Vs ENG : वॉशिंग्टनचा ‘सुंदर’ चौकार! इंग्लंडचा डाव गडगडला; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य..

२०१८ मध्ये केलं होतं लग्न 

सायना आणि ३८ वर्षीय कश्यप यांचे अगदी लहानपणापासून एकमेकांवर प्रेम होते आणि गेल्या ७ वर्षांपासून लग्न झाले होते. दोघांनीही २०१८ मध्ये लग्नाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले, कारण बराच काळ या दोन्ही स्टार्सनी त्यांचे नाते मीडिया आणि चाहत्यांच्या नजरेपासून दूर ठेवले होते. असे म्हटले जाते की त्यांच्या नात्याची सुरुवात त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात झाली होती. 

दोघांची भेट हैदराबादमधील दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांच्या अकादमीत झाली होती, जिथे ते दोघेही दिग्गज प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली प्रशिक्षण घेत होते. येथूनच दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. मात्र आता अनेक वर्षानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेत नक्कीच चाहत्यांना धक्का दिला आहे. 

सायनाची पोस्ट 

सायनाने शेअर केली आयजी स्टोरी

कारण काय ठरले?

सायना आणि पारूपल्लीने लग्न करूनही धक्का दिला होता. त्यांच्या अफेरच्याही कधी चर्चा झाल्या नाहीत आणि आता ते वेगळे होत आहेत तर यावरूनही कधीच चर्चा झाल्या नाहीत. त्यामुळे या जोडप्याने सर्वांनाच संभ्रमात टाकले आहे. मात्र या जोडीने कायम एकत्र रहावे असंच सर्वांना वाटत होते हे नक्की. सायना आणि पारूपल्ली यांचे लहानपणापासून एकत्र असणे आणि आता वेगळे होणे हे सर्वांसाठीच धक्कादायक आहे आणि अचानक घेतलेल्या या निर्णयाने सर्वच बुचकळ्यात पडले आहेत.

IND Vs ENG : मोहम्मद सिराजचा लॉर्ड्सवर मोठा कारनामा! भारताच्या ‘या’ दिग्गज गोलंदाजाला टाकले मागे..

Web Title: Saina nehwal parupalli kashyap announced divorced after 7 years of marriage shocked fans with decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2025 | 05:29 AM

Topics:  

  • Badminton
  • Celebrity
  • Divorce

संबंधित बातम्या

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’
1

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

‘कधीकधी अंतर तुम्हाला..’, फुलराणीचा चाहत्यांना सुखद धक्का; सायना नेहवाल आणि पती पारुपल्ली कश्यप पुन्हा एकत्र
2

‘कधीकधी अंतर तुम्हाला..’, फुलराणीचा चाहत्यांना सुखद धक्का; सायना नेहवाल आणि पती पारुपल्ली कश्यप पुन्हा एकत्र

‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सुरु केला नवा व्यवसाय;  रेस्टॉरंटचा फोटो शेअर करत म्हणाली आयुष्यात पुढचं पाऊल….
3

‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सुरु केला नवा व्यवसाय; रेस्टॉरंटचा फोटो शेअर करत म्हणाली आयुष्यात पुढचं पाऊल….

Grey Divorce: ‘नाही आता शक्य नाही…’ अनेक वर्ष संसारानंतर घटस्फोट घेणंं का होतंय नॉर्मल? वेळेसह नातंही थकतं का?
4

Grey Divorce: ‘नाही आता शक्य नाही…’ अनेक वर्ष संसारानंतर घटस्फोट घेणंं का होतंय नॉर्मल? वेळेसह नातंही थकतं का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.