
'Leaving my son in Dubai, I...', Sania Mirza expresses pain over separation from Shoaib Malik
हेही वाचा : IND vs SA 2nd Test :गुवाहाटी कसोटीत गिल न खेळल्यास पंतची लागेल लॉटरी! असेल खास इतिहास रचण्याची संधी…
सानिया मिर्झा म्हणाली की मुलगा इझान मलिकचे संगोपन करणे ही आता पूर्णपणे तिची जबाबदारी असून ती पूर्ण करणे खूप कठीण आहे. करण जोहरने तिचे समर्थन देत म्हटले की सानियाची परिस्थिती आणखी कठीण आहे कारण ती सीमापारची एक बाब आहे. सानिया सहमत झाली आणि म्हटली की, जेव्हा तिला कामासाठी मुंबईला जावे लागते तेव्हा तिला तिच्या मुलाला दुबईत सोडून जावे लागते. हा सर्व प्रकार तिच्यासाठी एक मोठा भावनिक संघर्ष ठरत आहे.
सानिया पुढे ती म्हणाली की, “मी दुबईमध्ये राहते आणि कामासाठी भारतात जात असते. इझानला आठवडे दुबईत सोडून मुंबईत येणे हे खूपच आव्हानात्मक असे आहे. बाकी सर्व काही व्यवस्थापित करता येते, पण हा भाग खूप कठीण आहे.”
सानियाने असा देखील खुलासा केला की घटस्फोटानंतर, तिने अनेकदा रात्रीचे जेवण देखील टाळले आहे.कारण, तिला एकटे जेवायला आवडत नाही. तिने असे देखील म्हटले की, सांगितले की कदाचित यामुळेच तिचे वजन देखील कमी झाले असावे. एकटे जेवण्याची इच्छा नसणे आणि काहीतरी छान पाहून झोपी जाणे हे तिच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग बनून राहिले आहे.
सानिया आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकचे २०१० मध्ये लग्न झाले होते. आंतरराष्ट्रीय स्टार जोडपे म्हणून अनेक वर्षे एकत्र घालवलेली आहेत . २०१८ मध्ये, सानियाने तिच्या गरोदर राहिली होती. त्याच वर्षी त्यांचा मुलगा इझानचा जन्म झाला. २०२४ मध्ये सानिया आणि शोएबचा घटस्फोट होऊन झाला. न्यायालयाकडून सानियाला तिच्या मुलाचा ताबा देण्यात आयाला. त्यानंतर ती एकटीच पालकत्व सांभाळीत आहे.
हेही वाचा : क्रिकेटच्या दुनियेतील अजब-गजब शॉट माहितीय का? ‘या’ खेळाडूंचे नावे ठरले ‘हे’ ट्रेडमार्क शॉट; वाचा सविस्तर
सानिया मिर्झा म्हणते की ती तिचे व्यावसायिक जीवन, वैयक्तिक जबाबदाऱ्या आणि एकटे पालकत्व यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करत असते. हा प्रवास सोपा नसला तरी, ती ताकदीने पुढे जात असून तिच्या मते, जीवन बदलते आणि प्रत्येक परिस्थितीशी जुळवून देखील घ्यावे लागत असते.