ऋषभ पंत आणि शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : क्रिकेटच्या दुनियेतील अजब-गजब शॉट माहितीय का? ‘या’ खेळाडूंचे नावे ठरले ‘हे’ ट्रेडमार्क शॉट; वाचा सविस्तर
गुवाहाटी कसोटीमध्ये यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत शुभमन गिलच्या जागी भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंत हा संघाचा उपकर्णधार आहे, त्यामुळे तो कर्णधार निश्चित मानले जात आहे. शुभमन गिलच्या जागी साई सुदर्शन किंवा देवदत्त पडिकल हे अंतिम अकरामध्ये संधी देण्यात येऊ शकते.
ऋषभ पंत पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. एमएस धोनीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणारा तो दुसराच यष्टीरक्षक-फलंदाज असणार आहे. रोहित शर्मानंतर ऋषभ पंतला पुढचा कर्णधार मानले जात होते, परंतु दुखापतीमुळे त्याची दीर्घकाळ अनुपस्थिती आणि या काळात शुभमन गिलची सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे पंतला कर्णधारपदाने हुलकावणी दिली. परंतु, पंत आता पुन्हा कर्णधारपदाच्या शर्यतीत आला आहे. ऋषभ पंतने यापूर्वी पाच टी-२० सामन्यांमध्ये भारताची धुरा सांभाळलेली आहे. भारतीय संघाने त्याकया नेतृत्वाखाली दोन सामने जिंकले आहेत, दोन गमावले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला होता.
हेही वाचा : Bangladesh vs Ireland: लिटन दासचा शतकी तडाखा! रचले तीन विक्रम; दिग्गजांच्या क्लबमध्ये केली रॉयल एंट्री
ऋषभ पंत कसोटी स्वरूपात भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. तो आक्रमकपणे धावा करण्यात पटाईत आहे आणि अनेकदा सामने भारताच्या बाजूने वळवण्यात माहिर आहे. हे त्याने अनेक वेळा दाखवून दिले आहे. ऋषभ पंतने ४८ कसोटी सामन्यांपैकी ८४ डावांमध्ये ८ शतके आणि १८ अर्धशतकांसह ३,४५६ धावा फटकावल्या आहेत.






