Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: ‘आरशात तुझं तोंड बघितलं का…’ Live TV वर भयंकर वाद, मुरली कार्तिक आणि संजय मांजरेकरने ओलांडल्या मर्यादा

Viral Video: माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर आणि मुरली कार्तिक यांच्यात गॉल कसोटीच्या समालोचनादरम्यान थेट प्रक्षेपण सुरू असतानाच जोरदार शाब्दिक चकमक झाली.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 19, 2026 | 10:47 AM
संजय मांजरेकर आणि मुरली कार्तिक यांचा वाद चव्हाट्यावर (फोटो सौजन्य - X.com)

संजय मांजरेकर आणि मुरली कार्तिक यांचा वाद चव्हाट्यावर (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • भारत विरूद्ध श्रीलंका मैदानाच्या बाहेर मोठा वाद 
  • समालोचनादरम्यान संजय मांजरेकर आणि मुरली कार्तिकने ओलांडल्या मर्यादा 
  • जोरदार शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल
Viral Video: गॉल येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, मैदानाबाहेरील समालोचन कक्षात एक विचित्र प्रसंग घडला. सामन्याच्या विश्लेषणादरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर आणि मुरली कार्तिक यांच्यात थेट प्रक्षेपण सुरू असतानाच जोरदार शाब्दिक चकमक झाली. हे दोन्ही माजी खेळाडू श्रीलंका दौऱ्यासाठी अधिकृत समालोचक म्हणून समालोचन आणि स्टुडिओ पॅनेलचा भाग आहेत. हा वाद विकोपाला गेला की दोघांनाही एकमेकांना बोलण्यात मर्यादाही ओलांडल्या. या वादाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. 

मुरली कार्तिकने वादाला सुरुवात केली

THAT ESCALATED QUICKLY! 😂 Shots were fired, comebacks followed, and our Extraaa Innings panel had an absolute laugh! 😅 Watch #SLvIND, 1st Test | Day 3, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #BeautifulGameOfTestCricket pic.twitter.com/hnJ0WPAgok — Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 17, 2026

सामन्यातील एका मुद्द्यावर चर्चा सुरू होती, पण अचानक संभाषण क्रिकेटपासून भरकटले आणि वैयक्तिक उपहासाकडे वळले. या संपूर्ण वादाची सुरुवात मुरली कार्तिकच्या एका टिप्पणीने झाली, ज्याने गंमतीने मांजरेकरच्या ओठांच्या विशिष्ट हावभावांवर (पाउट) प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यामुळे दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या दिसण्यावर आणि व्यक्तिमत्त्वावर टीका-टिप्पणीचा भडीमार सुरू झाला.

Rishabh Pant: ऋषभ पंतने रचला इतिहास! WTC मध्ये शुभमनला मागे सोडून बनला नंबर 1, अप्रतिम रेकॉर्ड

दोन दिग्गजांमधील वाद

कार्तिकने मांजरेकरवर टोमणा मारत म्हटले, ‘सर्वांकडूनच माझी एक छोटी आणि एक मोठी विनंती आहे. तुमचा शतकानंतरचा ओठांचा विशिष्ट हावभाव (पाउट) खूप प्रसिद्ध आहे, पण या हावभावांमुळे तुम्ही काय म्हणत आहात हे मला समजत नाही. कृपया तो पाऊट थोडा कमी करावा’ कार्तिकच्या टिप्पणीवर मांजरेकर गप्प बसले नाहीत आणि त्यांनी लगेच प्रत्युत्तर दिले. मांजरेकर यांनी स्क्रीन शेअरची मागणी करत म्हटले, ‘ते खूपच वाईट होतं. आपण स्प्लिट स्क्रीन करून कॅमेरा दुसऱ्या खेळाडूवर (दुसऱ्या सहकाऱ्यावर) लावू शकतो का? कारण त्याच्याशी बोलायला जास्त छान वाटतं आणि त्याचा चेहराही खूप प्रसन्न आहे.”

IND vs SL: गॉल कसोटीत Devdutt Padikkal चा ‘विराट’ विक्रम! सचिन-धवनलाही टाकलं मागे; द्रविडचा ‘हा’ ‘महारिकॉर्ड’ थोडक्यात हुकला

हा वाद बराच वेळ चालला

त्यानंतर मांजरेकर यांनी कार्तिकला डिवचत पुढे म्हटले, ‘मला याचं आश्चर्य वाटतं की मुरली कार्तिक आरशात स्वतःकडे पाहून स्वतःच्याच आवाजात म्हणतो, ‘उत्तम, उत्तम, उत्तम.’ कार्तिकने प्रत्युत्तर दिले, ‘मी स्वतःकडे कधीच पाहत नाही. ते तुझं काम आहे. जो कोणी तुला ओळखतो, जो तुझ्यासोबत खेळला आहे किंवा काम केले आहे, त्याला सगळं काही माहीत आहे.’

दोघांमधील हा शाब्दिक चकमक वाढत असल्याचे पाहून, मांजरेकर यांनी अखेरीस स्वतःच परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कार्तिकच्या दिसण्यावर शेवटचा टोला लगावत म्हटले, टमाझ्याकडे आरशात पाहण्याचं एक कारण आहे. मला समजतंय की आरशात पाहणं तुझ्यासाठी फारसं प्रेरणादायी नाही. असो, आपण दोघेही आपल्या मर्यादा ओलांडत आहोत, आणि सोशल मीडियावर याची चांगलीच खरडपट्टी निघेल.’ स्वतःला आवर घालत हा वाद संपला असला तरी अखेर खरंच हा वाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Web Title: Sanjay manjrekar and murli karthik on air fight during galle test commentary viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • IND vs SL
  • India vs Sri Lanka
  • Sanjay Manjrekar

संबंधित बातम्या

Rishabh Pant: ऋषभ पंतने रचला इतिहास! WTC मध्ये शुभमनला मागे सोडून बनला नंबर 1, अप्रतिम रेकॉर्ड
1

Rishabh Pant: ऋषभ पंतने रचला इतिहास! WTC मध्ये शुभमनला मागे सोडून बनला नंबर 1, अप्रतिम रेकॉर्ड

IND Vs SL: आता सगळे देवाच्या हातात! पाऊस ठरवणार विजेता? Team India ची वाट खडतर
2

IND Vs SL: आता सगळे देवाच्या हातात! पाऊस ठरवणार विजेता? Team India ची वाट खडतर

IND vs SL: गॉल कसोटीत Devdutt Padikkal चा ‘विराट’ विक्रम! सचिन-धवनलाही टाकलं मागे; द्रविडचा ‘हा’ ‘महारिकॉर्ड’ थोडक्यात हुकला
3

IND vs SL: गॉल कसोटीत Devdutt Padikkal चा ‘विराट’ विक्रम! सचिन-धवनलाही टाकलं मागे; द्रविडचा ‘हा’ ‘महारिकॉर्ड’ थोडक्यात हुकला

WTC Point Table: श्रीलंकेचा खात्मा निश्चित! मैदान गाजवल्यावर WTC पॉईंट्सचे समीकरण कसे ठरणार
4

WTC Point Table: श्रीलंकेचा खात्मा निश्चित! मैदान गाजवल्यावर WTC पॉईंट्सचे समीकरण कसे ठरणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.