Asia Cup 2025: 'No one has performed like him', 'this' former Indian cricketer jumps onto the field in support of Iyer
Sanjay Manjrekar supports Shreyas Iyer: आशिया कप २०२५ स्पर्धा ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी १९ ऑगस्ट रोजी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला स्थान देण्यात आले नाही. यावरून निवडकर्त्यांवर अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. श्रेयस अय्यरला वगळल्याचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. याबाबत आता माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी श्रेयस अय्यरला स्थान न दिल्याबद्दल निवडकर्त्यांवर जहरी टीका करत हा एकधक्कादायक निर्णय असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा : भारताचा ‘द वॉल’! Rahul Dravid ‘या’ गोलंदाजाविरुद्ध खेळायला घाबरायचा; आर आश्विन समोर दिली मोठी कबुली..
मांजरेकर यांनी इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, “गेल्या अनेक वर्षांपासून मी निवडकर्त्यांची ही प्रवृत्ती पाहत आलो आहे, की एका फॉरमॅटमधील कामगिरीच्या आधारे खेळाडूची निवड करण्यात येत आहे आणि नंतर त्याला दुसऱ्या फॉरमॅटमध्ये देखील स्थान दिले जाता आले आहे. जेव्हा मी पाहतो की एखाद्या खेळाडूला त्याच्या कसोटी कामगिरीमुळे टी-२० संघात समाविष्ट करण्यात येते, तेव्हा मला ते क्रिकेटच्या तर्काशी अजिबात जुळलेले वाटत नाही.”
मांजरेकर पुढे म्हणाले की, “श्रेयस अय्यरला आशिया कपसाठी भारताच्या टी-२० संघात स्थान न देणे खरोखरच खूप धक्कादायक आहे. हा तोच खेळाडू आहे ज्याला योग्य कारणासाठी भारतीय संघातून वगळण्यात आले. निवडकर्त्यांना वाटले की तो देशांतर्गत क्रिकेटकडे लक्ष देत नाही. यानंतर श्रेयस अय्यरवर याचा योग्य परिणाम झाला. त्यानंतर तो इंग्लंडविरुद्धच्या घरच्या एकदिवसीय मालिकेत परतला आणि त्याने अशी काही फलंदाजी केली ती त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्या मालिकेत त्याने एक देखील चूक केली नाही. त्याने आयपीएलमध्ये देखील तीच लय कायम ठेवली.”
शुभमन गिलला टी-२० संघात स्थान दिल्याने मांजरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मांजरेकर म्हणाले की, “संपूर्ण आयपीएल हंगामात कोणत्याही फलंदाजाने श्रेयस अय्यरसारखी कामगिरी केलेली नसेल. ५० पेक्षा जास्त सरासरी, १७० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करत गेम चेंजर कामगिरी केली, त्याची संघात निवड केली नाही, कदाचित अशा खेळाडूसाठी ज्याने पूर्णपणे वेगळ्या फॉरमॅटमध्ये, कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे.”
हेही वाचा : RCB संघाने Mohammad Siraj ला का दाखवला होता बाहेरचा रस्ता? कारण आलं समोर, वाचा सविस्तर..
मांजरेकर म्हणाले की, “केवळ एखाद्याने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली म्हणून त्याला टी-२० संघात स्थान दिले पाहिजे असे नाही, विशेषतः श्रेयस अय्यरसारख्या खेळाडूच्या बदल्यात तरी नाही. मला वाटते की संघाची निवड आणि भारतीय क्रिकेटमध्ये ११ खेळाडू खेळवणे हे आजकाल चांगले रहिले नसून मला वाटते की निवडकर्त्यांनी अय्यरसोबत खूप मोठी चूक केली आहे.”