PBKS vs RR: Sanju Samson breaks Shane Warne's record! Great performance for Rajasthan Royals...
PBKS vs RR : आयपीएल 2025 च्या 18 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा 50 धावांनी पराभव करत दुसरा विजय मिळवला. या सामन्यात पंजाब किंग्सला आयपीएल 2025 च्या पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राजस्थानने 205 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रतिउत्तरात पंजाबला 155 धावाच करता आल्या. राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सच्या घरच्या मैदानावर त्यांना 50 धावांनी पराभूत केले आहे. या विजयासह संजू सॅमसनने एक खास कामगिरी देखील आपल्या नावावर केली आहे. तो राजस्थान रॉयल्सच्या इतिहासात सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार ठरला आहे. शेन वॉर्नला मागे टाकत त्याने ही कामगिरी करून दाखवली आहे.
अधिक माहिती अशी की, संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करताना 32 सामन्यात विजय मिळवला आहे. या यादीमध्ये शेन वॉर्नचे नाव वर येत होते. राजस्थानचा कर्णधार असताना त्याने 31 सामने जिंकले होते. तर राजस्थानचा कर्णधार असताना राहुल द्रविडने 23 सामने जिंकण्याची किमया साधली होती.
याबाबत सांगायचे झाले तर शेन वॉर्नचा हा विक्रम मोडण्यासाठी संजू सॅमसनला 62 सामने लागले आहेत. तर वॉर्न केवळ 56 सामन्यांतच 31 विजय मिळवण्यात यशस्वी ठरला होता. त्याने 2008 मध्ये आयपीएलच्या उद्घाटन आवृत्तीत फ्रँचायझीला पहिले विजेतेपद पटकावून दिले होते. राजस्थानचा कर्णधार असताना संजू सॅमसनची विजयाची टक्केवारी 51.61 राहिली आहे. या हंगामात संजू सॅमसन पहिल्यांदाच कर्णधार होता.
चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला उतरेलल्या राजस्थान रॉयल्सच्या सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांनी संघाला शानदार सुरुवात करून दिली होती. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी झाली होती.
हेही वाचा : CSK vs DC : ‘तो जिंकण्याचा विचार करत नाही..’ : धोनीच्या फलंदाजीवर नवज्योतसिंग सिद्धू बरसला!
यादरम्यान संजू सॅमसन 38 धावा करून तंबूत परतला, तर यशस्वी जैस्वालने 67 धावांची खेळी केली. यानंतर परागने नाबाद 43 यांनी महत्वाचे योगदान दिले. राजस्थान रॉयल्सने पंजाबसमोर 205 धावांचे लक्ष्य देण्यात आले.
प्रत्युत्तरात या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदनात उतरलेल्या पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली. पॉवरप्ले दरम्यान त्यांनी महत्वाच्या 3 विकेट गामावल्या. त्यानंतर पंजाब संघाला पुनरागमन करता आले नाही. पंजाबकडून नेहल वढेराने सर्वाधिक 62 धावा केल्या, तसेच मॅक्सवेलने 30 तर प्रभसिमरन सिंगने 17 धावा केल्या. यावेळी कर्णधार श्रेयस अय्यरला मात्र जास्त वेळ तग धरता आला नाही. त्यामुळे पंजाबचा संघ 20 षटकांत केवळ 155 धांवापर्यंतच मजल मारू शकला.