Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 T20 World Cup 2026 : सूर्याआर्मीच्या चिंतेत वाढ! स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा हॉस्पिटलमध्ये भरती; भारताचा ‘प्लॅन बी’ काय? 

टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा चांगल्याच रंगात आली असून सर्व संघ मेहनत करत आहेत. दरम्यान, स्पर्धेतील दुसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारताच्या सलामीवीर अभिषेक शर्मा हॉस्पिटलमध्ये भरती झाला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 11, 2026 | 02:35 PM
T20 World Cup 2026: Big blow to Surya Army! Explosive batsman Abhishek Sharma admitted to hospital; What is India's 'Plan B'?

T20 World Cup 2026: Big blow to Surya Army! Explosive batsman Abhishek Sharma admitted to hospital; What is India's 'Plan B'?

Follow Us
Close
Follow Us:

IND vs NAM, T20 World Cup 2026 :  टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा चांगल्याच रंगात आली आहे. सर्व संघ मेंट करताना दिसत आहेत. दरम्यान, स्पर्धेतील दुसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाची चिंता वाढली आहे. भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा अचानक आजारी पडला आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका वृत्तानुसार, त्याला पोटाच्या संसर्गाचा त्रास जाणवू लागल्याने तो मंगळवारी संघाच्या सराव सत्रात देखील सहभागी होऊ शकला नाही.

हेही वाचा : PAK vs USA T20 World Cup: शाहीन आफ्रिदीला हरवणारा शुभम रांजणे आहे तरी कोण? सूर्यकुमार यादवशी आहे विशेष नाते

मागील सामन्यापासून अभिषेक शर्माची प्रकृती खराब असल्याची माहिती आहे. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो अस्वस्थ असल्याचे दिसून येत होते.परंतु सामना खेळल्यानंतर त्याची प्रकृती आणखी बिघडली. त्याला खूप ताप आला होता आणि तात्काळ आराम मिळावा म्हणून त्याला ड्रिप देखील देण्यात आला होता. या आजाराने त्याच्या कामगिरीवर देखील परिणाम झाल्याचे दिसले. कारण त्याला खाते न उघडताच माघारी जावे लागले होते. नंतर तो मैदानात देखील आला नव्हता. संपूर्ण सामन्यात त्याच्या जागी संजू सॅमसनने क्षेत्ररक्षण केले आणि सामना संपल्यानंतर अभिषेक खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यासाठी देखील बाहेर येऊ शकला नव्हता.

 नामिबियाविरुद्ध संघात स्थान संशयास्पद

बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, अभिषेक शर्माला दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्याच्या प्रकृतीचे मूल्यांकन करण्यासाठी चाचण्या करण्यात येत आहेत. सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेट यांनी आशा व्यक्त केली की तो पुढील दोन दिवसांत बरा होणार, परंतु त्याची सध्याची प्रकृती पाहता १२ फेब्रुवारी रोजी नामिबियाविरुद्धच्या सामन्यात त्याचा सहभाग संशयास्पद असल्याचे दिसत आहे. संघ व्यवस्थापन त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

वॉशिंग्टन सुंदर संघात सामील

अभिषेक शर्माच्या आजारपणात, भारतीय संघासाठी काही चांगली बातमी आहे. सहाय्यक प्रशिक्षकांनी पुष्टी केली आहे की अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर संघात सामील झाला आहे आणि दुसऱ्या गट सामन्यापूर्वी त्याने सराव देखील  सुरू केला आहे. याव्यतिरिक्त, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह १० दिवसांच्या विश्रांतीनंतर संघात परतला आहे आणि तो पूर्ण जोमाने गोलंदाजी करत आहे.

हेही वाचा : पाकिस्ताननंतर आता बांगलादेशने घेतला यू-टर्न, T20 World Cup मधून माघार घेत खेळाडूंना बनवले खलनायक

स्पर्धेतील इतर सामन्यांमध्ये, पाकिस्तानने अमेरिकेला ३२ धावांनी पराभूत करत आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. तसेच, न्यूझीलंडने यूएईला १० विकेट्सने मात दिली. तर नेदरलँड्सने नामिबियाला ७ विकेट्सने पराभूत केले.

Web Title: T20 world cup 2026 shock to india explosive batsman abhishek sharma admitted to hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Sanju Samson

संबंधित बातम्या

IPL 2026 : विराट कोहली, श्रेयस अय्यर ते तिलक वर्मापर्यत: आयपीएल 2026 मध्ये कोणाच्या हाती लागणार ऑरेंज कॅप?
1

IPL 2026 : विराट कोहली, श्रेयस अय्यर ते तिलक वर्मापर्यत: आयपीएल 2026 मध्ये कोणाच्या हाती लागणार ऑरेंज कॅप?

संजू सॅमसन, रुतुराज गायकवाड की आयुष म्हात्रे… CSK ची सलामीची जोडी कोणती असणार? कर्णधाराने केले उघड
2

संजू सॅमसन, रुतुराज गायकवाड की आयुष म्हात्रे… CSK ची सलामीची जोडी कोणती असणार? कर्णधाराने केले उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.