फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
Sanju Samson fined for slow over rate : काल गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना पार पडला. आयपीएल २०२५ मध्ये खेळल्या गेलेल्या २३ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ५८ धावांनी पराभव करून चौथा विजय मिळवला. या विजयासह, शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सचे वर्चस्व पॉइंट्स टेबलमध्येही दिसून आले आहे, आता गुजरात पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यातील पराभवानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला एका चुकीची मोठी किंमत मोजावी लागली, ज्यासाठी संजूला दंडही ठोठावण्यात आला आहे.
गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला दंड ठोठावण्यात आला आहे. या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्सला दंड ठोठावण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, रियान परागच्या नेतृत्वाखाली, राजस्थान संघालाही स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला होता. स्लो ओव्हर रेटमुळे कर्णधार संजूला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय, इम्पॅक्ट सबस्टीट्यूट्ससह उर्वरित खेळाडूंना ६ लाख रुपये किंवा त्यांच्या सामना शुल्काच्या २५ टक्के दंड भरावा लागणार आहे.
#RR’s rescue duo in motion 🩷
Sanju Samson and Shimron Hetmyer dig in to take #RR’s chase forward ⏩
Updates ▶ https://t.co/raxxjzY9g7#TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/l5ROgSuH3Y
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2025
आयपीएल २०२५ च्या २३ व्या सामन्यात, गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ५८ धावांनी पराभव केला. या हंगामात राजस्थान रॉयल्सचा हा तिसरा तिसरा पराभव होता आणि गुजरातचा चौथा विजय आहे. राजस्थानने सीझन-१८ मध्ये आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. त्यापैकी संजू सॅमसनच्या संघाने २ जिंकले आहेत आणि ३ गमावले आहेत. सध्या राजस्थान रॉयल्स संघ ४ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे.
सामन्याबद्दल सांगायचे झाले तर प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २० षटकांत २१६ धावा केल्या. गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक ८२ धावा केल्या. यानंतर, २१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान संघ १९.२ षटकांत १५९ धावांवर सर्वबाद झाला. गुजरातकडून गोलंदाजी करताना प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक ३ बळी घेतले. त्याचबरोबर शाहरुख खानने संघासाठी ३६ धावांची महत्वाची खेळी खेळली. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सचा संघ फक्त १५९ धावा करू शकला आणि संघाचे सर्व फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले.
राजस्थानच्या संघासाठी शिमरॉन हेटमायर याने संघासाठी चांगली खेळी खेळली पण तो संघाला विजयापर्यत नेऊ शकला नाही. हेटमायरने ३२ चेंडूंमध्ये ५२ डावांची खेळी खेळली, तर कॅप्टन संजू सॅमसन ४१ धावा केल्या. तुषार देशपांडे आणि महेश तीक्ष्णा यांनी प्रत्येकी २ विकेट नावावर केले.