Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने रचला इतिहास; High Jump मध्ये नवा राष्ट्रीय विक्रम, आशियाई क्रीडा स्पर्धेचे तिकीटही पक्के

Maharashtra Sarvesh kushare new national record in high jump: सर्वेश कुशारेने उंच उडीमध्ये राष्ट्रीय विक्रम मोडून इतिहास रचला. भुवनेश्वर येथे झालेल्या ६५ व्या राष्ट्रीय आंतर-राज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सर्वेशने तेजस्विन शंकरचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला आणि आगामी आशियाई खेळांमध्ये आपले स्थानही निश्चित केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 28, 2026 | 07:28 PM
महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने रचला इतिहास; High Jump मध्ये नवा राष्ट्रीय विक्रम, आशियाई क्रीडा स्पर्धेचे तिकीटही पक्के
Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने रचला इतिहास
  • High Jump मध्ये नवा राष्ट्रीय विक्रम
  • आशियाई क्रीडा स्पर्धेचे तिकीटही पक्के
भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय आंतरराज्यीय ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सर्वेश कुशारेने पुरुषांच्या उंच उडी (High Jump) स्पर्धेत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. कुशारेने २.३१ मीटर उंची पार करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने तेजस्विन शंकरचा ८ वर्षे जुना २.२९ मीटरचा विक्रम मोडला. यासोबतच, सर्वेश कुशारेने जपानमध्ये होणाऱ्या २०२६ च्या आशियाई खेळांमधील आपले स्थानही निश्चित केले आहे.

IND W vs AUS W Live: भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला; ‘करो या मरो’ सामन्यात टीम इंडियाने जिंकला टॉस; प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल

कुशारेने तिसऱ्या प्रयत्नात रचला इतिहास

महाराष्ट्राच्या ३१ वर्षीय सर्वेश कुशारेने २७ जून रोजी कलिंगा स्टेडियमवर झालेल्या उंच उडी स्पर्धेत आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. सर्वेशने उंच उडीमध्ये आपल्या तिसऱ्या प्रयत्नात २.३१ मीटरची उडी मारून इतिहास रचला. त्याने एप्रिल २०१८ मध्ये तेजस्विन शंकरने प्रस्थापित केलेला २.२९ मीटरचा विक्रम मोडला. कुशारेने तिसऱ्या प्रयत्नानंतर २.३५ मीटरची उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. २.३१ मीटरच्या नव्या राष्ट्रीय विक्रमासह, सर्वेश कुशारेने भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचा पात्रता निकषही सहजपणे पार केला, ज्यामुळे २०२६ च्या आशियाई खेळांमधील त्याच्या सहभागाचा मार्ग मोकळा झाला आहे.

२०१९ मध्ये इंडियन ओपन जिंकून ओळख निर्माण केली

सर्वेश कुशारे गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उंच उडी स्पर्धेत देशातील आघाडीच्या खेळाडूंपैकी एक राहिला आहे. २०१९ मध्ये इंडियन ( Indian Open High Jump) ओपन उंच उडीचे विजेतेपद पटकावल्यावर कुशारेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर त्याने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, जिथे त्याने २.२१ मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकले. बँकॉक येथे झालेल्या २०२३ च्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने २.२६ मीटरची उडी मारून रौप्यपदक जिंकले आणि बुडापेस्ट येथील जागतिक चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली. कुशारेने पॅरिस ऑलिम्पिकमध्येही सहभाग घेतला होता आणि टोकियो येथे २०२५ मध्ये झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये उंच उडी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला, जिथे त्याने २.२८ मीटर उडी मारून सहावे स्थान पटकावले.

IND vs IRE 2nd T20 Live: भारताचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; प्रिन्स-शेडगेचे पदार्पण, वैभवला पुन्हा डावलले

Web Title: Sarvesh kushare high jump national record asian games 2026 qualification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 07:28 PM

Topics:  

  • asian games
  • athletes
  • Athletics
  • indian athletes

संबंधित बातम्या

Asian Games: अवघ्या ०.०८ सेकंदांचा थरार; वियतनामला धूळ चारत भारतीय चौकडीने पटकावले ‘रौप्य’
1

Asian Games: अवघ्या ०.०८ सेकंदांचा थरार; वियतनामला धूळ चारत भारतीय चौकडीने पटकावले ‘रौप्य’

Asian Games 2026: महिला स्किट शूटिंग टीमने मिळवून दिलं भारताला आठवं मेडल, रायजा-परिनाझची कमाल
2

Asian Games 2026: महिला स्किट शूटिंग टीमने मिळवून दिलं भारताला आठवं मेडल, रायजा-परिनाझची कमाल

IND W vs SL W Final: शेफाली-स्मृतीचा धडाका, भारताने फायनलमध्ये उभा केला धावांचा डोंगर, रचला इतिहास
3

IND W vs SL W Final: शेफाली-स्मृतीचा धडाका, भारताने फायनलमध्ये उभा केला धावांचा डोंगर, रचला इतिहास

Asian Games: वय वर्ष अवघे 13, गोल्ड मेडल जिंकून बनवला ऐतिहासिक रेकॉर्ड; जगाला केलं अचंबित
4

Asian Games: वय वर्ष अवघे 13, गोल्ड मेडल जिंकून बनवला ऐतिहासिक रेकॉर्ड; जगाला केलं अचंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.