सेमिफायनमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी हा सामना भारतासाठी महत्वाचा आहे. जर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवले, तर त्यांचे सेमिफायनलमधील स्थान जवळपास निश्चित होईल. पराभव झाल्यास, भारताला दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३७ सामने खेळले गेले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने २७ सामने जिंकले आहेत, तर भारताने फक्त ९ सामने जिंकले आहेत. तर एक सामना ड्रॉ राहिला आहे.
ऑस्ट्रेलियाने आपले सुरुवातीचे चारही सामने जिंकले आहेत. ते सध्या ‘अ’ गटाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असून सेमिफायनलमधील त्यांचे स्थान जवळपास निश्चित करण्याच्या उंबरठ्यावर आहेत. दुसरीकडे, भारताला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागले. चारपैकी तीन सामने जिंकून ‘विमेन इन ब्लू’ संघ तिसऱ्या स्थानावर आहे. पाच सामन्यांतून आठ गुणांसह दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे.
पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवल्यानंतर, भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर, संघाने बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात दमदार कमबॅक करत शानदार विजय मिळवला. ४ सामन्यांत ३ विजयांसह भारताचे ६ गुण झाले असून, त्यांचा नेट रन रेट +२.२६८ आहे.
भारत: स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, श्री चरानी, रेणुका सिंग ठाकूर, क्रांती गौड.
ऑस्ट्रेलिया: बेथ मूनी (विकेटकीपर), जॉर्जिया वोल, फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, ॲशले गार्डनर, जॉर्जिया वेअरहॅम, ॲनाबेल सदरलँड, निकोला केरी, सोफी मोलिन्यू (कर्णधार), किम गार्थ, लुसी हॅमिल्टन.






