बेलफास्टमधील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. पहिल्या डावात हवामान ढगाळ असल्यास, गोलंदाजांना आणखी फायदा होऊ शकतो. गोलंदाज नव्या चेंडूने कहर करू शकतात, ज्यामुळे सलामीच्या फलंदाजी करणे तितके सोपे असणार नाही. परंतु, सुरुवातीची षटके संपल्यानंतर फलंदाज सहजपणे धावा करू शकतात. जर फलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये विकेट्स टिकवून ठेवल्या, तर ते नंतर वर्चस्व गाजवू शकतात. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
पहिल्या सामन्यात आयर्लंडने भारताला ३४ धावांनी हरवले. या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरच्या संघ निवडीवर आणि गोलंदाजीच्या रणनीतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामन्याच्या १६ व्या षटकात, खेळपट्टीवर दोन उजव्या हाताचे फलंदाज असताना, अय्यरने पहिल्यांदाच वॉशिंग्टन सुंदरकडे चेंडू सोपवला. याच षटकात सामना पूर्णपणे आयर्लंडच्या बाजूने पालटला.
भारताने आजचा सामना जिंकला तरीही ही दोन सामन्यांची मालिका जिंकू शकत नाही. हा सामना जिंकून टीम इंडिया फक्त मालिका ड्रॉ करु शकते. त्यामुळे या सामन्यात टीम इंडिया कमबॅक करणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.
भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.
आयर्लंड: टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (कर्णधार आणि विकेटकीपर ), बेंजामिन क्लॅट्रिज, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, लियाम मॅककार्थी, मॅथ्यू हम्फ्रेस, जय मुंद्रा, मॅथ्यू हॉलर्ड.
ॲन्सी सोजनने Long Jump मध्ये रचला इतिहास; अंजू बॉबी जॉर्जचा २२ वर्ष जुना राष्ट्रीय विक्रम मोडला






