Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: World Cup 2027 च्या नव्या फॉरमॅटवरून ICC विरुद्ध मोर्चा! ‘या’ दोन देशांचा तीव्र विरोध; उपस्थित केले गंभीर सवाल

Netherlands Scotland calls out icc 2027 world cup new format: क्रिकेट स्कॉटलंड आणि रॉयल डच क्रिकेट असोसिएशनने २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या नवीन स्वरूपावरून आयसीसीवर टीका केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 12, 2026 | 03:16 PM
Cricket News: World Cup 2027 च्या नव्या फॉरमॅटवरून ICC विरुद्ध मोर्चा! ‘या’ दोन देशांचा तीव्र विरोध; उपस्थित केले गंभीर सवाल
Follow Us
Follow Us:
  • ICC च्या निर्णयाने क्रिकेटविश्वात खळबळ
  • २०२७ वर्ल्ड कपच्या फॉरमॅटवर या देशांचा आक्षेप
  • कसे आहे २०२७ विश्वचषकाचे नवीन स्वरूप?
दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे २०२७ चे आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक आयोजित केले जाणार आहे. यावेळी या विश्वचषकाच्या स्वरूपात केलेल्या बदलांवरून वाद निर्माण झाला आहे. क्रिकेट स्कॉटलंड आणि रॉयल डच क्रिकेट असोसिएशनने (KNCB) या बदलांवर तीव्र टीका केली आहे. हे बदल आंतरराष्ट्रीय क्रिकेटची निष्पक्षता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता धोक्यात आणतील, असे म्हटले आहे. दोन्ही क्रिकेट मंडळांनी केवळ नवीन स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही, तर इतके मोठे बदल कोणत्या प्रक्रियेअंतर्गत आणि कसे लागू करण्यात आले, असाही प्रश्न विचारला आहे.

Lionel Messi चा फुटबॉलमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक; नेमकं कारण काय? मैदानावर कधी परतणार?

कसे आहे २०२७ विश्वचषकाचे नवीन स्वरूप?

नवीन स्वरूपानुसार, २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात एकूण १४ संघ सहभागी होतील. परंतु, प्रथम क्रमवारीत १२व्या, १३व्या आणि १४व्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये पात्रता फेरी खेळवली जाईल. त्यातून केवळ एकच संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरेल. यानंतर, मुख्य स्पर्धेत १२ संघांना प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांमध्ये विभागले जाईल. दोन्ही मंडळांचा सर्वात मोठा आक्षेप या बदलाच्या वेळेवर आणि प्रक्रियेवर आहे.

विश्वचषकाच्या १८ महिने आधी बदलावर प्रश्नचिन्ह

दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणाऱ्या विश्वचषकाला १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत, क्रिकेट स्कॉटलंड आणि केएनसीबी (KNCB) स्पर्धेचे स्वरूप आणि पात्रता मार्गात केलेल्या मोठ्या बदलांमुळे नाराज आहेत. एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, ‘पुरुषांच्या ५० षटकांच्या विश्वचषकासाठी पात्रता मार्ग आणि स्पर्धेच्या स्वरूपात इतके मोठे बदल करण्याच्या आयसीसीच्या निर्णयामुळे क्रिकेट स्कॉटलंड आणि रॉयल डच क्रिकेट असोसिएशन अत्यंत निराश आहेत.’ दोन्ही मंडळांच्या मते, हे बदल सहयोगी सदस्य देशांच्या क्रिकेटसाठी एक मोठा धक्का आहेत आणि यामुळे जागतिक स्तरावर क्रिकेटचा विस्तार करण्यासाठी गेल्या काही वर्षांत केलेल्या प्रयत्नांना हानी पोहोचू शकते.

दोन्ही बोर्डाने या प्रक्रियेवर व्यक्त केली नाराजी

क्रिकेट स्कॉटलंड आणि केएनसीबीने म्हटले आहे की, ‘ ज्यावेळी क्रिकेट नवीन देशांपर्यंत आणि नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे, अशा वेळी विकसनशील राष्ट्रांच्या महत्त्वपूर्ण संधी कमी करणे हा एक चुकीचा संदेश देतो.’

बोर्डाने म्हटले की, ‘आम्ही जागतिक क्रिकेटला मजबूत करण्यासाठी आयसीसी आणि इतर सदस्य देशांसोबत काम करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहोत. परंतु, आम्हाला या बदलांचे परिणाम आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेबद्दल गंभीर चिंता आहे.’

ICC कडून प्रतिसाद न मिळाल्याबद्दल देश निराश

बदलांच्या घोषणेनंतर, या दोन्ही देशांनी इतर सहयोगी सदस्य राष्ट्रांसोबत मिळून आयसीसीसोबत दोन बैठका घेतल्या. त्यांनी बदलांसंबंधी अधिकृत लेखी माहिती आणि संपूर्ण प्रक्रियेचे स्पष्टीकरण मागितले. त्यांनी भविष्यातील निर्णयांमध्ये सुधारणा करण्याची आणि पूर्ण सदस्य राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय नियोजन बैठकांमध्ये सहयोगी सदस्यांचा समावेश करण्याचीही विनंती केली.

परंतु, दोन्ही बोर्डाने संयुक्त निवेदनात म्हटले की, ‘दुसऱ्या बैठकीला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ लोटूनही त्यांना आयसीसीकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. हे निराशाजनक असून आम्ही उपस्थित केलेल्या गंभीर मुद्द्यांचा हा अनादर आहे.’

आयसीसीकडे चर्चा करण्यासाठी पुन्हा अपील

क्रिकेट स्कॉटलंड आणि केएनसीबीने अखेरीस आयसीसीला सहयोगी सदस्य राष्ट्रांशी संवाद पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले आहे. जागतिक क्रिकेटच्या दीर्घकालीन हिताला प्राधान्य देऊन, सर्व सदस्य राष्ट्रांशी खुल्या आणि पारदर्शक पद्धतीने चर्चा व्हावी, अशी दोन्ही मंडळांची इच्छा आहे. ‘आम्ही आयसीसीला आवाहन करतो की, त्यांनी आपल्या सहयोगी सदस्यांशी पुन्हा संवाद साधावा आणि सर्व सदस्य राष्ट्रांशी खुल्या व पारदर्शक पद्धतीने चर्चा करून जागतिक क्रिकेटच्या दीर्घकालीन हिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे,’ असे संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

King Kohli चा रेकॉर्ड धोक्यात! Shubman Gill रचणार WTC मध्ये इतिहास; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरणार

Web Title: Scotland netherland cricket board calls out icc for 2027 world cup new format

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • ICC
  • Jay shah
  • Netherlands

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.