शाहरुख खानचे पहिले अर्धशतक : आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये लढत सुरु आहे. यामध्ये गुजरात टायटन्सचा फलंदाज शाहरुख खानने धमाका केला आहे. 2021 साली आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहरुख खानला वाट पाहावी लागली, पण RCB विरुद्ध खेळल्या जात असलेल्या आयपीएल 2024 च्या 45व्या मॅचमध्ये शाहरुखने बॅटने धमाका दाखवला.
गुजरातकडून फलंदाजी करताना सलामीवीर स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले आणि यानंतर शाहरुख खान आणि साई सुदर्शन यांनी संघाचा डाव सांभाळला आणि 24 चेंडूंचा सामना करत शाहरुख खानने आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावले.
First #TATAIPL 5️⃣0️⃣! ?
Mubarak ho, Shahrukh bhai ?#AavaDe | #GTKarshe | #GTvRCB pic.twitter.com/j0qphB70yJ— Gujarat Titans (@gujarat_titans) April 28, 2024
गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली. गुजरात संघाचे दोन्ही सलामीवीर रिद्धिमान साहा आणि शुभमन गिल स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. पॉवरप्लेनंतर गुजरातला गिलच्या रूपाने दुसरा धक्का बसला. यानंतर साई सुदर्शन आणि शाहरुख खानने संघाचा डाव सांभाळला. गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहरा यांनी शाहरुख खानला फलंदाजीसाठी पाठवले आणि त्याचा निर्णय संघासाठी कामी आला.