फोटो सौजन्य - Shubhankar Mishra
शशांक सिंग : आयपीएल 2025 सध्या शेवटच्या टप्प्यात आहे आता फक्त 14 सामने शिल्लक आहेत. यामध्ये आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये जाणारे तीन संघ पक्के झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आहेत. पंजाब किंग्सच्या संघाने मागील १० वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. या सीझनमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्व संघाने कमालीची कामगिरी केली आहे. मागील सीझनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात जेतेपद नावावर केले होते. त्यानंतर त्याला मेगा ऑक्शनमध्ये सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची बोली लावण्यात आली आणि पंजाब किंग्सच्या संघाने त्याला विकत घेतले होते.
RCB आणि KKR या संघामध्ये IPL Playoff आधी झाला बदल! रोवमन आणि लुंगीच्या जागेवर कोणाला मिळणार स्थान
पंजाब किंग्सच्या दुसरा फलंदाज म्हणजेच शशांक सिंग याला संघाने मेगाऑक्शनमध्ये रिटेन केले होते. ‘म्हणतात ना मेहनतीचं फळ फार गोड असतं’ असंच काहीसं पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंग यांच्यासोबत झाले. आयपीएल 2025 सुरू होण्याआधी त्याने एक पॉडकास्ट केला होता यामध्ये असे काही म्हटले आणि ते त्यांना सिद्धही करून दाखवले. शशांक सिंग याने शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये youtube वर दावा केला होता की पंजाब किंग्सचा संघ हा या सीजनमध्ये प्ले ऑफ मध्ये स्थान पक्के करणार आहे.
Punjab Kings 🌟 Shashank Singh Said n had a bet with shubankar Mishra that PBKS will finish on Top 👑
He will send text after season
Shashank is so confident n also friend with Sheryas n Retained player he know a lot 🦁Positive n top notch confidence 🦁
❤️ Love Punjab ❤️ pic.twitter.com/RbrRY5ePPe
— Baaz Bal (@BaazBal) March 16, 2025
वायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पत्रकार आणि youtube वर शुभंकर मिश्रा हे शशांक सिंग याला प्रश्न विचारतात की, तुझे आईपीएल 2025 मधील टॉप चार संघ कोणते आहेत. यावर शशांक सर्वात आधी पंजाब किंग्सचे नाव घेतो. यावेळी शुभंकर मिश्रा हे म्हणतात की यावेळी तुम्ही स्टॉप चार मध्ये असणार का? तर बोलतो हा टॉप चार नाही टॉप दोन मध्ये असणार आम्ही. तेव्हा शुभंकर मित्र म्हणतात की बघ विचार करून बोल तो म्हणाला हा हा सर जेव्हा आमचा 14 वा सामना होईल आणि मॅच संपतील तेव्हा मी तुम्हाला मेसेज करून म्हणेन की हा पॉडकास्ट तुम्ही पुन्हा चालवा.