
Who hunted down 'Gabbar'? This cricketer is going to tie the knot again! Read the complete love story.
Shikhar Dhawan will marry Sophie Shine : ‘गब्बर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताचा माजी सलामीवीर शिखर धवनने १२ जानेवारी रोजी त्याची प्रेयसी सोफी शाइनशी साखरपुड्याची घोषणा केली आहे. धवनने सोमवारी त्याच्या सोशल मीडिया हँडलद्वारे चाहत्यांना ही आनंदाची माहिती दिली. मागील वर्षी १ मे रोजी या दोघांनी त्यांच्या नात्याची अधिकृत माहिती दिली होती. त्यानंतर शिखर आणि सोफी काही काळापासून डेटिंग करत आहेत.
शिखर धवनने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये सोफीचा धवनच्या हाताशी असलेला हात दिसून येत आहे. फोटोमध्ये शाइनच्या बोटावर लग्नाची अंगठी देखील दिसत आहे. यावेळी धवनने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “स्मितहास्य वाटण्यापासून ते स्वप्ने वाटण्यापर्यंत. आम्ही कायमचे एकत्र राहण्याचा निर्णय घेत असताना आमच्या लग्नासाठी सर्व प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्याबद्दल आभारी आहे.” त्यांच्या साखरपुड्याचा हा फोटो सोशल मीडियावर लवकरच व्हायरल होत आहे. तसेच, गब्बरच्या फोटोवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा : Vijay hazare trophy 2025 : देवदत्त पडिक्कलने घडवला इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला
शिखर धवन आणि सोफी शाइन हे दोघे पहिल्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ दरम्यान एकत्र दिसुन आले होते. त्यानंतर हे जोडपे चर्चेचा विषय बनत गेले. त्यानंतर काही वेळातच धवनने त्यांच्या नात्याला दुजोरा दिला. तसेच सोफी आणि धवन सोशल मीडिया पोस्टवर वारंवार एकत्र दिसून आले.
आयरिश उत्पादन सल्लागार अलणाऱ्या सोफी लिमरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मार्केटिंग आणि मॅनेजमेंट पदवी घेतली आहे. ती सध्या अबू धाबीमधील नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशनची दुसरी उपाध्यक्ष आहे.
शिखर धवनने अडीच वर्षांपूर्वी आयेशा मुखर्जीसोबत घटस्फोट घेतला होता. या काळात धवनकडुन आरोप करण्यात आला होता की, आयेशाने त्याचा “मानसिक छळ” केला आहे. धवनपेक्षा १० वर्षांनी मोठी असलेली आयेशा ही एक किकबॉक्सर आहे जिने २०१२ मध्ये भारतीय क्रिकेटपटूशी लग्न केले होते. २०२१ मध्ये, आयेशाने सोशल मीडियावर धवनपासून वेगळे होत असल्याची घोषणा केली होती.
शिखर धवनने ३४ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. यामध्ये त्याने ७ शतकांसह २,३१५ धावा आणि १६७ एकदिवसीय सामने खेळलेले आहेत, ज्यामध्ये त्याने १७ शतके आणि ३९ अर्धशतकांसह ६,७९३ धावा पटकावल्या आहेत. तसेच त्याने ६८ टी-२० सामन्यांमध्ये भारतासाठी २७.९२ च्या सरासरीने १,७५९ धावा केल्या आहेत.