केएल राहुल(फोटो-सोशल मीडिया)
KL Rahul has overtaken Virat Kohli : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रविवारी वडोदरा येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ४९ व्या षटकात ४ विकेट्सने विजय मिळवला. केएल राहुलने ९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला. यासह, केएल राहुलने एक मोठा कारनामा केला आहे. त्याने सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत विराट कोहलीला पिछाडीवर सोडले आहे.
न्यूझीलंडविरुद्ध केएल राहुलने ४९ व्या षटकात ख्रिश्चन क्लार्कच्या डावातील शेवटच्या तीन चेंडूंवर ४, ४ आणि ६ धावा करून भारताला विजय मिळवून दिला.केएल राहुलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून देण्याची ही सहावी वेळ ठरली आहे.केएल राहुलने एकदिवसीय सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यासाठी सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत त्याने आता विराट कोहलीला पिछाडीवर सोडले आहे. एकदिवसीय स्वरूपातील स्टार मानल्या जाणाऱ्या विराट कोहलीने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत पाच वेळा हा कारनामा केला आहे.
आता केएल राहुलची नजर महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमावर असणार आहे. माजी कर्णधार एमएस धोनीने सर्वाधिक एकदिवसीय विजयांचा विक्रम षटकार मारून रचला आहे. कप्तान कुल धोनीने त्याच्या कारकिर्दीत नऊ वेळा ही किमया साधली आहे. केएल राहुलकडे अजून देखील धोनीचा विक्रम मोडण्याची नामी संधी आहे. यामध्ये तो तो यशस्वी होतो की नाही हे पाहणे महत्वाचे असणार आहे. केएल राहुलने २१ चेंडूत नाबाद २९ धावा केल्या आहेत. त्याने आपल्या या छोटेखानी खेळीत दोन चौकार आणि एक षटकार मारला आहे.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊन न्यूझीलंडला फलंदाजीसाठी पाचारण केले. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत डॅरिल मिशेलच्या ८४, हेन्री निकोल्सच्या ६२ आणि डेव्हॉन कॉनवेच्या ५६ धावांच्या मदतीने ८ बाद ३०० धावा उभ्या केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने विराट कोहलीच्या ९३, शुभमन गिलच्या ५६ आणि श्रेयस अय्यरच्या ४९ धावांच्या जोरावर ४९ षटकांत ६ बाद ३०६ धावा करत चार विकेट्सने सामना आपल्या नावे केला .






