शोएब अख्तर : पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर नेहमीच कोणत्यातरी कारणामुळे नेहमीच चर्चेत असतो. २७ एप्रिल रोजी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यांमध्ये पाकिस्तानने हा सामना 9 धावांनी जिंकला. या सामन्यादरम्यान शोएब अख्तरही मैदानात होता. स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी शोएबच्या घोषणा देण्यास सुरुवात केली, त्यानंतर शोएब अख्तरने असे काही ट्विट केले ज्यामुळे चाहते हताश झाले.
शोएब अख्तरचे ट्विट
शोएब अख्तरने ट्विटमध्ये लिहिले, “‘शाओब शाओब’चे ते नारे खूप हृदयस्पर्शी होते. मला तुमच्या सर्वांसाठी गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा मैदानात जायचे होते. मला खूप आनंद झाला!!” हा भावनिक मेसेज पाहून चाहत्यांनीही कमेंटमध्ये सांगायला सुरुवात केली की, त्यांना तो पुन्हा बघायला आवडेल.
Those “shaibi shabi” chants were so heart touching. I wanted to go out and bowl for all of you again.
Goosembumps!! pic.twitter.com/0MMccitPN1— Shoaib Akhtar (@shoaib100mph) April 28, 2024
शोएब अख्तर निवृत्तीनंतर परतणार का?
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी-20 सामन्यादरम्यान शोएब उपस्थित होता. तेथे त्याने आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी जल्लोष करणाऱ्या प्रेक्षकांकडे सुपूर्द केली. मैदानावरील वातावरण इतकं तापलं की ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ परतण्याचा विचार करू लागला आहे का? यानंतर त्यांनी एका ट्विटद्वारे निवृत्तीवरून परतण्याचे संकेत दिले आहेत असे चाहत्यांचे म्हणणे आहे.