Champions Trophy: 'I didn't get the recognition I expected...'; 'Ya' star Indian player expresses regret after winning the Champions Trophy...
Champions Trophy : नुकतीच भारताने चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले आहे. भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करत तब्बल 12 वर्षांनंतर चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या मधल्या फळीतील महत्त्वाचा खेळाडू असणाऱ्या श्रेयस अय्यरने या संपूर्ण स्पर्धेमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्याने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दरम्यान, तो म्हटला की, ‘कोलकाता नाईट रायडर्सने गेल्या वर्षी तिसऱ्या आयपीएल ट्रॉफीमध्ये विजय मिळवला असूनही त्याला अपेक्षित असलेली ओळख मिळाली नाही.’ असे अय्यर बोलला.
यावर्षी श्रेयस अय्यर पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार असणारा आहे, त्याला संघाने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. श्रेयस अय्यरने ‘द टाइम्स ऑफ इंडिया’शी संवाद साधताना सांगितले की, ‘मला वैयक्तिकरित्या असे वाटले की आयपीएल जिंकल्यानंतर मला अपेक्षित असलेली ओळख मिळाली नाही. पण शेवटी, जोपर्यंत तुमचा स्वाभिमान आहे, तुम्ही योग्य ते काम करत राहणे, तेच सर्वात महत्त्वाचे आहे. मी ते करत राहिलो आहे.’
गेल्या वर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकणारा अय्यर आठवा कर्णधार ठरला आहे. केकेआरला तिसऱ्यांदा चॅम्पियन बनवण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली. केकेआरने अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला होता. इतकेच नाही तर तीन हंगाम फ्रँचायझीचा भाग राहिल्यानंतर देखील केकेआरने त्याला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनंतर पंजाब किंग्जने त्याला 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले. जी आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोली ठरली होती.
हेही वाचा : Shubman Gill : भारताच्या स्टार क्रिकेटपटू शुभमन गिलला डेट करतेय ‘ही’ तरुणी..; सोशल मीडियावर रंगलीय चर्चा..
पंजाब किंग्स ही आयपीएलमधील अय्यरची तिसरी फ्रँचायझी असणार आहे. त्याने 2015 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससह आयपीएलला सुरुवात केली आणि 2018 मध्ये त्याला कर्णधारपद मिळाले. 2020 मध्ये, त्याने प्रथमच आयपीएल फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते.
श्रेयस अय्यरने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये चांगली कामगिरी केलीय आहे. त्याने स्पर्धेत 243 धावा केल्या आहेत. तो न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रनंतर सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. तसेच 2024 हे वर्ष देखील त्याला चांगले गेले आहे. रणजी आणि इराणी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई संघाचाही तो भाग होता. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने डिसेंबर २०२४ मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दुसऱ्यांदा जिंकली होती.