Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs JAPAN: अरे बाबा त्याला संधी द्या रे! जपानविरुद्ध Vaibhav Suryvanshi ला संधी मिळणार का?

Asian Games 2026: जपानविरुद्ध श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. मात्र या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाणार का हे बघावे लागेल.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 21, 2026 | 08:24 PM
Asian Games 2026

Asian Games 2026

Follow Us
Follow Us:

एशियन गेम्समध्ये भारत-जपान भिडणार 
श्रेयस अय्यर करणार भारताचे नेतृत्व 
वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्याची शक्यता

Asian Games 2026: आशिया क्रीडा स्पर्धेत पुरुष क्रिकेट सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघ आणि जपानी पुरुष क्रिकेट एका संघ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात आमनेसामने येणार आहेत.श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानमध्ये दाखल झाला आहे. मात्र या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाणार का हे पहावे लागणार आहे.

जपानविरुद्ध श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. मात्र या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाणार का हे बघावे लागेल. आता मुख्य सामन्यात श्रेयस अय्यर वैभवला प्लेईंग इलेव्हन मध्ये स्थान देतो की त्याला बेंचवरच बसावे लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एशियन गेम्ससारख्या मोठ्या मंचावर उतरण्यापूर्वी जपानविरुद्धचा हा टी-२० सामना भारतीय संघासाठी सरावाची उत्तम संधी मानला जात आहे. वैभव सूर्यवंशीला प्लेईंग ११ मध्ये संधी मिळाल्यास आपल्या धमाकेदार फलंदाजीने छाप पाडण्याचा त्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे.

IND vs JPN T20: भारत-जपान पहिल्यांदाच भिडणार! कुठे पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या संपूर्ण माहिती

सध्या भारतीय संघातील सलामीवीर आणि मधल्या फळीतील फलंदाज तुफान फॉर्ममध्ये आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानचा ३-० असा धुव्वा उडवला आहे. अशा स्थितीत श्रेयस अय्यर वैभव सूर्यवंशीला संधी देणार की नाही हे पहावे लागेल. भारतीय संघ आणि निवड समिती काय निर्णय घेणार हे महत्वाचे असेल.

कधी आणि कुठे रंगणार सामना?

भारतीय क्रिकेट संघ पहिल्यांदाच जपानविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे असून, आशियाई क्रीडा स्पर्धेआधी जपानविरुद्ध सामना खेळला जाईल. हा सामना मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी नाणेफेक होईल. हा सामना जपानमध्ये दाखल झाल्यावर भारतीय संघासाठी हा एक सराव सामना असेल, तसेच जपानी संघालाही तयारी करण्याची संधी मिळेल. परंतु, हा एक आंतरराष्ट्रीय सामना असल्याने, त्याची आकडेवारी खेळाडूंच्या प्रोफाइलमध्ये जोडली जाईल.

Asian Games: पाकड्यांना दाखवला इंगा! टेबल टेनिसमध्ये भारताने उडवला लाज काढणारा धुव्वा

भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार) , वैभव सूर्यवंशी , यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रजत पाटीदार, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

Web Title: Shreyas iyer gave chance to vaibhav suryvanshi against japan in asian games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 08:24 PM

Topics:  

  • asian games 2026
  • India vs japan
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

भलं मोठं संकट! Asian Games ला ‘या’ चक्रीवादळाचा रेड अलर्ट; ‘इतक्या’ वेगाने जपानवर धडकणार
1

भलं मोठं संकट! Asian Games ला ‘या’ चक्रीवादळाचा रेड अलर्ट; ‘इतक्या’ वेगाने जपानवर धडकणार

IND vs JPN T20: भारत-जपान पहिल्यांदाच भिडणार! कुठे पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या संपूर्ण माहिती
2

IND vs JPN T20: भारत-जपान पहिल्यांदाच भिडणार! कुठे पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Asian Games: पाकड्यांना दाखवला इंगा! टेबल टेनिसमध्ये भारताने उडवला लाज काढणारा धुव्वा
3

Asian Games: पाकड्यांना दाखवला इंगा! टेबल टेनिसमध्ये भारताने उडवला लाज काढणारा धुव्वा

Asian games 2026: गड्यांनो लयं भारी! कबड्डीत भारताचा जपानवर ४९-२३ असा दणदणीत विजय
4

Asian games 2026: गड्यांनो लयं भारी! कबड्डीत भारताचा जपानवर ४९-२३ असा दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.