IND vs WI: Shubman Gill's explosion continues! He smashed Don Bradman's record by scoring a century against West Indies.
Shubman Gill breaks Don Brandman’s record : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर दूसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या पहिल्या डावात कर्णधार शुभमन गिलनेही शानदार कामगिरी करत आपले १० वे कसोटी शतक झळकवले. गिलने या शतकासह एक विक्रम रचला आहे. शुभमन गिल १२ डावांनंतर कसोटीत सर्वाधिक ५०+ धावा करणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे.
शुभमन गिलने कर्णधार म्हणून विराट कोहलीला मागे टाकले आहे. कोहलीने कसोटीत कर्णधार म्हणून १२ डावांमध्ये एकूण ५०+ धावा केल्या होत्या. आता शुभमन गिलने सहाव्यांदा कर्णधार म्हणून ५०+ धावा करून ही कामगिरी केली आहे. भारतीय कसोटी कर्णधार म्हणून १२ डावांमध्ये सर्वाधिक वेळा ५०+ धावा करण्याचा विक्रम एमएस धोनीच्या नावावर जमा आहे. धोनीने आठ वेळा १२ डावांमध्ये सर्वाधिक ५०+ धावा करण्याची किमया केली आहे.
शुभमन गिलने १७७ चेंडूचा सामना करत आपले १० वे कसोटी शतक पूर्ण केले आहे. शुभमन गिल हा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा आघाडीचा धावा करणारा खेळाडू असून सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे. भारताच्या कर्णधाराने वर्ल्ड टेस्ट क्रिकेट इतिहासात १० शतके झळकावली आहेत.
शुभमन गिलने या वर्षी कर्णधार म्हणून पाच कसोटी शतके लागावळी आहेत. एका वर्षात भारतीय कर्णधाराने सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत त्याने विराट कोहलीसोबत बरोबरी साधली आहे. याव्यतिरिक्त, गिल कर्णधार म्हणून पाच कसोटी शतके झळकावणारा दुसराच भारतीय कर्णधार आहे. गिलने फक्त १२ डावात पाच शतके झळकावण्याची किमया साधली आहे. सुनील गावस्कर यांनी फक्त १० डावात पाच शतके थोकण्याची कामगिरी केली आहे.
हेही वाचा : भारताच्या हरलीन देओलविरुद्धची कृती भोवली! दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाज म्लाबाला आयसीसीने झापले
कर्णधार म्हणून सर्वात जलद पाच कसोटी शतके झळकावण्याचा विक्रम डॉन ब्रॅडमन यांच्या नावे होता. भारताचा कर्णधार गिलने त्यांना मागे टाकले आहे. डॉन ब्रॅडमनचा विक्रम कर्णधार म्हणून १३ डावात शतके झळकावली आहेत. दरम्यान, गिलने फक्त १२ डावात कर्णधार म्हणून पाच शतके झळकवण्याची किमया साधली आहे.