नॉनकुलुलेको म्लाबा(फोटो-सोशल मीडिया)
Nonkululeko Mlaba Punished by ICC : महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या दहाव्या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आले होते. या सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाज नॉनकुलुलेको म्लाबाला तिच्या कृतीबद्दल आयसीसीकडून फाटकारण्यात आले. गुरुवारी विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर ३ विकेट्सने विजय मिळवला.
भारतीय संघाच्या डावाच्या १७ व्या षटकामध्ये ही घटना घडली जेव्हा म्लाबाने हरलीन देओलला माघारी पाठवले. विकेट घेतल्यानंतर हरलीन देओवल माघारी जात असताना म्लाबाने हात हलवून निरोप दिल्याची कृती केली. २४ वर्षीय डावखुरी फिरकी गोलंदाजाने आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.५ चे उल्लंघन केल्याचे दिसून आला. जे आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान फलंदाजाला बाद केल्यानंतर अपशब्द वापरण्याशी संबंधित आहे.
हेही वाचा : IND vs WI : भारतीय कर्णधाराने झळकावले शतक! रोहित शर्मा आणि सौरव गांगुलीला मागे टाकून रचला इतिहास रचला
आयसीसीकडून फिरकी गोलंदाजाला अधिकृतपणे फटकारण्यात आले आणि त्याच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडण्यात आला आहे. २४ महिन्यांच्या कालावधीत म्लाबाचा हा पहिलाच गुन्हा ठरला आहे. आयसीसीनुसार, लेव्हल १ च्या उल्लंघनासाठी किमान शिक्षा म्हणजे अधिकृत फटकार, तसेच त्याच्या मॅच फीच्या जास्तीत जास्त ५० टक्के दंड आणि प्रकरणाच्या तीव्रतेनुसार एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट असतो. आयसीसीकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, “म्लाबाने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने मॅच रेफरीने सुचवलेली शिक्षा स्वीकारली, त्यामुळे औपचारिक सुनावणीची आवश्यकता नव्हती.”
विश्वचषकाच्या आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांमध्ये भारत त्यांचे पहिले पाच ते सहा विकेट लवकर गामावत आला आहे. तेव्हा खालच्या फळीतील फलंदाजांमुळेच ते आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकले आहेत. भारताच्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, नॅडिन डी क्लार्कने कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तिने ५४ चेंडूमध्ये नाबाद ८४ धाव केल्या. यामध्ये तिने आठ चौकार आणि पाच षटकार मारले. तिने क्लो ट्रायॉन (४९) सोबत सातव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी रचली आणि दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
हेही वाचा : Photo : शुभमन गिलचा नवा पराक्रम, रोहित शर्माचा विक्रम मोडत WTC मध्ये सर्वाधिक शतके करणारा बनला भारतीय
तत्पूर्वी, फिरकीपटू ट्रायॉने ३ विकेट्स आणि नॉनकुलुलेको म्लाबाने २ विकेट्स घेऊन भारताला सहा बाद १०२ धावांवर रोखले होते परंतु रिचा घोष आठव्या क्रमांकावर येऊन तिने ७७ चेंडूत ९४ धावा केल्या. यामध्ये तिने ११ चौकार आणि चार षटकार मारले. स्नेह राणाने ३३ धावा केल्या. या दोघींनी आठव्या विकेटसाठी ५३ चेंडूत ८८ धावांची जलद भागीदारी करून यजमान संघाला २५१ धावांपर्यंत पोहचवले.