साई सुदर्शन(फोटो-सोशल मीडिया)
Sai Sudarshan’s stunning catch: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मलिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर १० ऑक्टोबरपासून खेळला जात आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावात ५१८ धावा करून डाव घोषित केला आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरवात खराब झाली. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या डावात, साई सुदर्शनने सर रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर एक अप्रतिम झेल टिपला. तो झेल पाहून सर्वच अवाक झाले. हा एक असा झेल घातक देखील ठरू शकला असता. या झेलबद्दल माहीत घेऊया.
साई सुदर्शनने सर रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर शॉर्ट लेगवर जीवाला धोका ठरेल असा झेल घेतला आहे.ज्यामुळे फलंदाज देखील स्तब्ध झाल्याचे दिसून आला. हा एक असा झेल होता ज्याने सर्वांनाच चकित केले. सुदर्शनने शॉर्ट लेगवर हा झेल टिपला. वेस्ट इंडिजच्या फलंदाजाने प्रत्यक्षात एक शक्तिशाली स्वीप शॉट मारला असताना मध्ये साई सुदर्शन भिंत बनून उभा होता. चेंडू थेट शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या साई सुदर्शनच्या हाताला लागल्यानंतर, तो त्याच्या हेल्मेटला लागला आणि नंतर त्याच्या हातात परत गेला. कॅम्पबेलने मारलेला शॉट इतका शक्तिशाली होता की, त्यामुळे सुदर्शनच्या बोटांना देखील दुखापत झाली. त्यानंतर, त्याला वैद्यकीय तपासणीसाठी मैदान सोडावे लागले.
हेही वाचा : भारताच्या हरलीन देओलविरुद्धची कृती भोवली! दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाज म्लाबाला आयसीसीने झापले
साईला कॅच घेताना झालेली दुखापत अधिक गंभीर असल्याने होती, त्यामुळे साईला बोटांची तपासणी करण्यासाठी मैदान सोडावे लागले. साई सुदर्शनची दुखापत किती गंभीर आहे आणि त्याला किती काळ मैदानाबाहेर राहावे लागेल हे पाहणे बाकी आहे.
𝗘𝗮𝗿𝗹𝘆 𝗗𝗼𝗺𝗶𝗻𝗮𝗻𝗰𝗲! 🔥@imjadeja breaks the opening stand with India’s first wicket, giving #TeamIndia an early advantage. 🙌 Catch the LIVE action 👉 https://t.co/tg7ZEVlTSH#INDvWI 👉 2nd Test, Day 2 | Live Now on Star Sports & JioHotstar pic.twitter.com/60acjVZnAV — Star Sports (@StarSportsIndia) October 11, 2025
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी भारताने पाच बाद ५१८ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. यशस्वी जयस्वाल (२५८ चेंडूत १७५) आणि कर्णधार शुभमन गिल (१९६ चेंडूत नाबाद १२९) यांनी शतके झळकावली, तर साई सुदर्शन (८७) यांनी अर्धशतक झळकावले. डावखुरा फिरकी गोलंदाज जोमेल वॉरिकन (३/९८) हा वेस्ट इंडिजचा सर्वोत्तम गोलंदाज ठरला.
हेही वाचा : Photo : शुभमन गिलचा नवा पराक्रम, रोहित शर्माचा विक्रम मोडत WTC मध्ये सर्वाधिक शतके करणारा बनला भारतीय