फोटो सौजन्य - सोशल मीडिया
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धा झाली. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करून मालीका ३-१ अशी जिंकून जेतेपद नावावर केले. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू सॅम कॉन्स्टास याला संधी मिळाली होती. त्याने संघासाठी कमालीची कामगिरी केली होती त्याचबरोबर मालिकेदरम्यान तो ऑस्ट्रेलियाचा सर्वात चर्चित खेळाडू राहिला होता. त्याने भारताच्या खेळाडूंशी पंगा घेण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
आता ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील २ सामन्यांची कसोटी मालिका २९ जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाची कमान पॅट कमिन्सच्या हातात नसून स्टीव्ह स्मिथच्या हातात आहे. या मालिकेसाठी पॅट कमिन्सला विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर फलंदाज सॅम कॉन्स्टासने बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेत टीम इंडियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. सॅमने पदार्पणाच्या सामन्यातच अप्रतिम कामगिरी केली होती. त्यानंतर श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघातही त्याची निवड झाली आहे. मात्र, सॅम कॉन्स्टन्स पहिल्या सामन्यात सलामी करताना दिसणार नाही.
श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार असलेल्या स्टीव्ह स्मिथने मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, “ट्रॅव्हिस हेड उस्मान ख्वाजासोबत सलामीवीर फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. त्याशिवाय मला वाटते की ते खूपच स्थिर असेल. यामुळे काही मोठा बदल होईल असे मला वाटत नाही. हेडने नवीन चेंडूवर अप्रतिम कामगिरी केली आहे आणि झटपट धावाही केल्या आहेत.
JUST IN: Travis Head will open the batting alongside Usman Khawaja in Galle. @ARamseyCricket with the latest selection news from Galle #SLvAUS https://t.co/ITPmQkbR1V — cricket.com.au (@cricketcomau) January 28, 2025
स्मिथ पुढे म्हणाला की, “सॅम कॉन्स्टासने बॉक्सिंग डे कसोटीत भारताविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावून कसोटी क्रिकेटमध्ये धमाका निर्माण केला होता, आता त्याला मधल्या फळीतील खेळाडू म्हणून संघात स्थान मिळाले असते. श्रीलंका दौऱ्यात त्याला खूप काही शिकायला मिळणार आहे.
सॅमने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात केली होती. त्याने जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली सारख्या खेळाडूंचा सामना केला. दुस-यांदा, ट्रॅव्हिस हेडने २०२३ मध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियासाठी शेवटची सलामी दिली होती, त्यादरम्यान जखमी डेव्हिड वॉर्नरच्या जागी हेडला सलामीला फलंदाजीची संधी मिळाली. सॅम कॉन्स्टन्स प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडल्यास मधल्या फळीत नॅथन मॅकस्विनी आणि जोश इंग्लिस यांना संधी मिळू शकते.
ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पराभूत करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या संघाची लढणार आहे.