SL vs BAN: Bangladesh squad announced! 'These' players have won the lottery in the ODI series against Sri Lanka..
SL vs BAN : बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी १६ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. सलामीवीर नईम शेखला या संघात संधि देण्यात आली आहे. नईम शेख दोन वर्षांनी संघात दाखल झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला २ जुलैपासून सुरवात होत आहे. या मालिकेतील शेवटचा सामना ८ जुलै रोजी खेळवला जाणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने कोलंबोमध्ये खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना पल्लेकेलेमध्ये पार पडणार आहे.
बीसीबीकडून मेहदी हसन मिराजच्या नेतृत्वाखाली संघाची घोषणा करण्यातआली आहे. ८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ९५ धावा करणाऱ्या नईम शेख व्यतिरिक्त, लिटन दास, तन्वीर इस्लाम आणि हसन महमूद सारख्या खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आले आहे. त्याच वेळी, बांगलादेशच्या दोन अनुभवी खेळाडूंनी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
हेही वाचा : भारतीय क्रिकेटच्या दादाने कशाचा होतोय पश्चाताप? सौरभ गांगुली कारकिर्दीत ‘या’ गोष्टीला मुकला..
वेगवान गोलंदाज तस्किन अहमद आणि मुस्तफिजूर रहमान हे देखील दुखापतीतून सावरले बरे झाल्यानंतर राष्ट्रीय संघात परतले आहेत. सौम्य सरकार आणि नसुम अहमद यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर बांगलादेश संघात अनेक बदल झाले आहेत.
बीसीबीचे मुख्य निवडकर्ता गाजी अशरफ हुसेन यांनी संघाची घोषणा करतेवेळी म्हटले की, नईम शेख हा संघाचा बॅकअप ओपनर आहे. यामुळे तो प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार नाही निश्चित झाले आहे. ते म्हणाले की, “मला वाटते की त्याने त्याचा फलंदाजीचा हेतू आणि पॅटर्न बदलला आहे आणि आम्हाला तिसऱ्या सलामी फलंदाजाकडून हेच हवे आहे, कारण तमीम आणि इमॉन ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहेत. त्याच प्रकारच्या आक्रमकतेने फलंदाजी करण्यासाठी आम्ही अशाच प्रकारच्या आक्रमकतेने फलंदाजी करणाऱ्या खेळाडूचा शोध घेत आहोत.”
मेहदी हसन मिराझ (कर्णधार), तनजीद हसन, परवेझ हुसैन इमॉन, नईम शेख, नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदॉय, लिटन दास, जाकेर अली अनिक, शमीम हुसेन, रिशाद हुसेन, तन्वीर इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकिब, तस्किन अहमद आणि नाहिद राणा.