सौरभ गांगुली(फोटो-सोशल मीडिया)
Interview with Sourav Ganguly : माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली भारतीय क्रिकेट विश्वात ‘दादा’ मधून ओळखले जाते. ते त्याच्या मैदानातील वावरावरून. तो नेहमी त्याच्या स्पष्ट बोलणण्याने प्रसिद्ध आहे. गांगुलीने भारतीय संघाला परदेशात जिंकण्याची सवय लावली. या दरम्यान सौरव गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३८ शतके झळकावली आहेत. इतके करून देखील गांगुली या संख्येवर खूश असल्याचे दिसत नाही. त्याने सांगितले की त्याला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक शतके गमावल्याचा पश्चात्ताप असल्याचे सांगितले आहे.
गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १८५७५ धावा केल्या आहेत. त्याने केवळ दोन फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले आहे. गांगुलीने भारतासाठी ३११ एकदिवसीय आणि ११३ कसोटी सामने खेळले आहेत. १८ हजारांहून अधिक धावा केल्यानंतर देखील त्याला त्याच्या कारकिर्दीत अनेक शतके गमावल्याची खंत आहे. जुन्या गांगुलीला तो काय सल्ला देऊ इच्छितो? असे गांगुलीला विचारले असता गांगुलीने ही खंत बोलून दाखवली.
हेही वाचा : IND Vs ENG : ‘काहींना वाटले माझी कारकीर्द संपेल..’, इंग्लंडला रडवणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या विधानाने क्रीडा विश्वात खळबळ..
माझे अनेक वेळा शतक हुकले..
पीटीआयला मुलाखत देताना गांगुलीने सांगितले की, “मी अनेक वेळा शतक लगावणे चुकवले आहे, मला अधिक धावा करायला हव्या होत्या. मी अनेक वेळा ९० आणि ८० धावाच केल्या.” जर आपण गांगुलीच्या आकडेवारी बघितली तर असे दिसून येते की तो ३० वेळा ८० किंवा ९० धावांचा आकडा ओलांडल्यानंतरही तो माघारी परतला आहे. जर तो या डावांना शतकांमध्ये रूपांतरित करू शकला असता, तर त्याच्या नावावर ५० पेक्षा जास्त शतके जमा राहिली असती.
जेव्हा गांगुली हा एकटा असतो तेव्हा त्याला त्याचे जुने डाव पाहणे आवडत असल्याचे त्याने सांगितले. हे जूने डाव त्याला आठवण करून देते की तो अधिक शतके करण्याच्या किती जवळ पोहचला होता. तो म्हणाला की “मी एकटा असतो तेव्हा मी माझे (फलंदाजीचे) व्हिडिओ पाहत असतो. जेव्हा माझी पत्नी घरी नसते कारण साना लंडनमध्ये राहते. मी युट्यूब वर जातो आणि पाहतो आणि स्वतःला सांगतो अरे, मी पुन्हा ७० धावांवर बाद झालो आहे. मला शतक करायला हवे होते. पण आता तुम्ही त्यात बदल करू शकत नाहीत.”
हेही वाचा : IND Vs ENG : ‘पंतला क्रिकेट गणित चांगलेच..’, माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीकडून शतकवीर रिषभचे कौतुक..
सौरभ गांगुलीने एकदिवसीय सामन्यात ७२ आणि कसोटी क्रिकेटमध्ये ३५ अर्धशतके लागावली आहेत. कर्णधार म्हणून कधीकधी कठीण निर्णय घेणे खूप आवश्यक असतात. अशा वेळी जगातील महान लेग स्पिनरपैकी एक असणाऱ्या अनिल कुंबळेला संघातून वगळल्याबद्दल गांगुलीने खंत व्यक्त केली. तो म्हणाला की अनिल कुंबळेला काही वेळा संधी मिळाली नाही, कारण तो खूप चांगला खेळाडू होता. असे गांगुलीने सांगितले आहे.