जसप्रीत बूमराह(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. २० जूनपासून लीड्स येथे पहिल्या कसोटी सामन्याला सुरवात झाली आहे. भारताने पहिल्या डावात ४७१ उभारल्या तर इंग्लंडने प्रतिउत्तरात ४६५ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बूमराहने ५ विकेट्स घेऊन ब्रिटिशांचे कंबरडे मोडले आणि भारताने तिसऱ्यादिवसांअखेर ६ धावांची आघाडी मिळवली होती. बूमराहने शानदार गोलंदाजी करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्याने ८३ धावांत ५ गडी माघारी पाठवले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जसप्रीत बूमराहने आपल्या टिकाकारांना चांगलेच उत्तर दिले आहे. त्याच्या विधानाने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी करत ८३ धावांत ५ बळी मिळवले. बुमराहसमोर इंग्लंडचे फलंदाज निष्प्रभ दिसून आले. बुमराहने २४.४ षटकांत ८३ धावांच्या मोबदल्यात ५ विकेट्स घेतल्या. बुमराहच्या शानदार कामगिरीने भारतीय संघाला ६ धावांची आघाडी मिळवून दिली. या दरम्यान भारताच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फटका देखील बूमराहला बसला आहे. अन्यथा इंग्लंडचा संघ ४०० पार देखील करू शकला नसता. सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना बुमराह म्हणाला, की, “लोकांनी इतक्या वर्षांत म्हटले आहे की, मी फक्त आठ महिने खेळू शकेल. तर काहींनी म्हटले आहे की दहा महिने पण आता मी १० वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलो असून १२-१३ वर्षे आयपीएल देखील खेळलो आहे.” अशा शब्दांत त्याने टिकाकारांना सुनावले आहे.
हेही वाचा : IND Vs ENG : ‘पंतला क्रिकेट गणित चांगलेच..’, माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीकडून शतकवीर रिषभचे कौतुक..
बुमराह पुढे म्हणाला, “आताही काही लोक दुखापतीनंतर म्हणतात की, मी संपेन, मी निघून जाईन.. त्यांना जे म्हणायचे ते म्हणू द्या, मी माझे स्वतःचे काम करत राहील. या गोष्टी दर चार महिन्यांनी येत राहतील. पण जोपर्यंत देवाची इच्छा आहे तोपर्यंत मी खेळत राहील. मी माझी पूर्ण तयारी करतो आणि मग त्याला मला किती आशीर्वाद द्यायचे ते मी देवावर सोडतो”
हेही वाचा : पृथ्वी शॉ मुंबई क्रिकेट संघ सोडणार? दुसऱ्या राज्याकडून खेळण्याची योजना! MCA कडून मागितली माफी
बुमराहने पुढे म्हटले की, “माझे नाव चर्चेत येत राहणे प्रेक्षकांना आवडते, पण मला त्यात काही अडचण येत नाही.” तसेच तो म्हणाला की, “खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे, जरी सामन्याच्या शेवटी ती थोडी तुटण्याची शक्यता असते. सध्या ती फलंदाजीसाठी खूप चांगली खेळपट्टी असून ती थोडी दुतर्फा आहे, खेळपट्टीवर कोणतीही समस्या नाही, हवामानामुळे नवीन चेंडू स्विंग होणार, परंतु कसोटी क्रिकेटमध्ये तुम्हाला हेच अपेक्षित असते. आम्हाला मोठ्या धावा करायचे असून ते एक चांगले लक्ष्य साध्य करायचे आहे.”