Smriti Mandhana's big bang after 6 years! She reached number one in the ODI rankings..
ICC Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भारतीय संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाला मोठा फायदा झाला आहे. आता ६ वर्षांनंतर तिने पुन्हा एकदा एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत पहिला नंबर पटकावला आहे. तर दुसरीकडे, आणखी एका भारतीय खेळाडूला मोठा फटका बसला आहे. तर, दक्षिण आफ्रिकेची अनुभवी खेळाडू लॉरा वोल्वार्डलाही नवीन क्रमवारीत नुकसान सहन करावे लागले आहे. तसेच, इंग्लिश खेळाडू नॅट सायव्हर-ब्रंटला मोठा फायदा झाल्याचे दिसत आहे.
हेही वाचा : Ravichandran Ashwin च्या अडचणीत वाढ! मदुराई पँथर्सने केला ‘हा’ गंभीर आरोप, बंदी लागण्याची दाट शकता…
भारतीय संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना एकदिवसीय क्रमवारीत पुन्हा पहिल्या नंबरव विराजमान झाली आहे. यादी जाहीर होण्यापूर्वी ती दुसऱ्या स्थानावर होती तर लॉरा वोल्वार्ड नंबर वन होती. आता लॉरा तिसऱ्या क्रमांकावर घरसली असून इंग्लंडची खेळाडू नॅट सायव्हर ब्रंट दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे. यापूर्वी ती तिसऱ्या स्थानावर होती. यानुसार, स्मृती मानधना आणि नॅट सायव्हर यांना १-१ गुण मिळाले आहेत तर, लॉरा वोल्वार्ड्स यांना २ गुण मात्र कमी झाले आहेत.
भारताची दुसरी खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज आयसीसी रँकिंग यादीत १५ व्या स्थानावर तर कर्णधार हरमनप्रीत कौर १६ व्या स्थानावर विराजमान आहे. जर आपण टीम इंडियाची फिरकी गोलंदाज दीप्ती शर्माबद्दल सांगायचे झाल्यास ती एका गुणाच्या नुकसानासह ३३ व्या स्थानावर घसरली आहे. त्याच वेळी, यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोष ४१ व्या नंबरवर आहे.
🚨 SMRITI MANDHANA BECOMES THE NUMBER 1 RANKED BATTER IN WOMEN’S ODI RANKING 🚨 pic.twitter.com/989yhtyuQ0
— Johns. (@CricCrazyJohns) June 17, 2025
हेही वाचा : IND vs ENG 1st Test Pitch report : पहिल्या डावात किती धावा होतील? कशी असेल हेडिंग्लेची खेळपट्टी
आपण अष्टपैलू खेळाडूंच्या यादीबद्दल सांगायचे झाल्यास येथे फारसा बदल झालेला नाही. विशेषतः टॉप १० चे चित्र काही बदललेले दिसत नाही. दुसरीकडे, किम गार्थ गोलंदाजी क्रमवारीत ५ व्या स्थानावर असून ऑस्ट्रेलियाची अलाना किंग सहाव्या स्थानावर आहे. तर इंग्लंडची केट क्रॉस यादीत सातव्या स्थानावर आहे. जर आपण भारतीय खेळाडूंकडे पाहिले तर ते टॉप १० रँकिंगमध्ये दिसत नाहीत. रेणुका सिंग ठाकूर एकूण २४ व्या स्थानावर आहे, ती सध्या भारताची अव्वल क्रमांकाची गोलंदाज आहे.