फोटो सौजन्य : BCCI
भारत विरुद्ध इंग्लंड मालिका सुरु व्हायला फक्त तीन दिवस शिल्लक असताना अनेक या संदर्भात अपडेट समोर येत आहेत. टीम इंडिया ही नव्या खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे. भारताचा संघ हा शुभमन गीलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. करून नायर, साई सुदर्शन त्याचबरोबर अभिमन्यू ईश्वरन यांसारखे नवे खेळाडू हे भारतीय संघाचा भाग आहेत. यामधील कोणत्या खेळाडूने प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार हे पाहणे मनोरंजक ठरेल. इंग्लंड संघाचे नेतृत्व हेहॅरी ब्रूक करणार आहे इंग्लिश संघामधील अनेक अनुभवी खेळाडूंचा सामना करावा लागणार आहे.
पहिला सामना हा 20 जून ते 24 जून यादरम्यान खेळवला जाणार आहे. मालिकेचा पहिला सामना २० जून रोजी हेडिंग्ले, लीड्स येथे खेळला जाणार आहे (हेडिंग्ले क्रिकेट ग्राउंड पिच रिपोर्ट). यापूर्वी, एका क्युरेटरने हेडिंग्ले कसोटीच्या पिचबाबत मोठे विधान केले आहे. पीच रिपोर्टनुसार भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले जाऊ शकतात या संदर्भात सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहे.
18 वर्षात एकही विजय नाही! शुभमनची सेना इतिहास बदलणार? वाचा दोन्ही संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड
हेडिंग्ले येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी, पिच क्युरेटरने पिचबाबत एक विधान दिले आहे. त्यांनी १६ जून रोजी खेळपट्टीच्या स्थितीबद्दल सांगितले. मुख्य क्युरेटर म्हणाले की त्यांना खेळात बॅट आणि बॉलमध्ये चांगले संतुलन हवे आहे. रेव्हस्पोर्ट्झला दिलेल्या मुलाखतीत, पिच क्युरेटर रॉबिन्सन म्हणाले की, मागील विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांप्रमाणे हा सामना पूर्ण पाच दिवस चालावा आणि तीन दिवसांत संपू नये अशी त्यांची इच्छा आहे.
क्युरेटर पुढे म्हणाले की, हेडिंग्लेच्या खेळपट्टीवर सीम आणि बाउन्सचा इतिहास असूनही, कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ एकूण ३०० धावा करेल अशी त्यांची अपेक्षा आहे. ते असेही म्हणाले, “मला वाटतं पहिल्या डावात ३०० धावा केल्या तर बरं होईल. पुढच्या दोन डावात जास्त धावा होण्याचीही शक्यता आहे. बघूया कसं होतं ते. मला वाटतं ते बॅट आणि बॉल दोघांसाठीही चांगलं असेल. सुरुवातीला गोलंदाजांना मदत मिळेल आणि नंतर खेळ जसजसा पुढे जाईल तसतसे ते सपाट होईल. तापमान २७-२८ अंश असण्याची अपेक्षा आहे, जे तिथे खूप गरम असेल. त्यामुळे सुरुवातीला थोडी ओलावा सोडून ते कसं चालतं ते पाहणं चांगलं आहे. गवत कमी केलं जाईल.”