
Smriti Mandhana Wedding: Cricket lost, friendship won! Jemima Rodrigues took 'this' big decision for Smriti Mandhana's honorarium
Jemima Rodrigues leaves WBBL for Mandhana : भारताची स्टार महिला फलंदाज स्मृती मानधना आणि मंगेतर पलाश मुच्छल यांचे २३ नोव्हेंबर रोजी लग्न पार पडणार होते. या जोडीचे हळदी आणि संगीत समारंभ देखील पार पडले होते. परंतु, लग्नाच्या फक्त एक दिवस आधी अचानक स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली आणि समारंभ पुढे ढकलण्यात आला. यावरून सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. स्मृतीच्या लग्न समारंभात मैत्रीण जेमिमा रॉड्रिग्जही खूप आनंदी दिसून आली होती. दरम्यान रॉड्रिग्जने मोठा निर्णय घेतला आहे. रॉड्रिग्ज सध्या सुरू असलेल्या बिग बॅश लीग हंगामात ब्रिस्बेन हीट संघाचा भाग होती. परंतु, तिने मानधनाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी स्पर्धा अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता मानधनाच्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे, तिने मानधनासह राहण्याचा निर्णय घेतला आहे. WBBL फ्रँचायझीकडून देखील तिच्या निर्णयाचा आदर करण्यात आला आहे.
हेही वाचा : Ind vs Sa 2nd Test: अरेरे..!भारतापेक्षा पाकची कामगिरी सरस! एका वर्षात दुसऱ्यांदा व्हाईट वॉश
मानधनाचे लग्न पुढे ढकलण्यात आले. कारण तिच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली आहे. लग्नाच्या काही दिवस आधी, मंधानाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना सांगलीतील सर्वहित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आता मंधाना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.
एका वृत्तानुसार, मंधानाचे वडील श्रीनिवास मंधाना आता धोक्याबाहेर आले असून ते मुंबईला परतले आहेत. ते सध्या विश्रांती घेत आहेत आणि त्यांची प्रकृती सुधारत आहे. स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर, दोन्ही कुटुंबातील अनेक सदस्यांनी लग्न समारंभ अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याच्या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. स्मृतीचे वडील श्रीनिवास यांना मंगळवार, २५ नोव्हेंबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
ब्रिस्बेन हीटकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की संघ तिच्या निर्णयाचा आदर करतो. फ्रँचायझीचे सीईओ टेरी स्वेन्सन यांनी सांगितले की, “जेमिमासाठी हा खूप आव्हानात्मक काळ आहे. जरी ती उर्वरित WBBL मध्ये सहभागी होऊ शकणार नसली तरी, आम्ही तिच्या भारतात राहण्याच्या निर्णयाचे समर्थन करत आहोत. आमचा संघ त्यांना आणि मंधानाच्या कुटुंबाला शुभेच्छा देत आहे.”