राहुल गांधी यांनी अंध टी-२० विश्वचषक विजेत्या संघाची भेट घेतली(फोटो-सोशल मीडिया)
Rahul Gandhi meets women’s blind cricket team : नवी दिल्लीतील 10 जनपथ येथे बुधवारी एका खास क्षण पार पडला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 2025 चा अंध महिला टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाची भेट घेऊन त्यांइंत्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या सत्कार समारंभात राहुल गांधी यांनी खेळाडूंना त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. सोबतच त्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि आवडीचे कौतुक करण्यात आले. राहुल गांधी यांनी सांगितले की, संघाची शिस्त, संयम आणि क्रीडा वृत्ती संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान बनून राहिले आहे.
राहुल गांधींनी सोशल मीडियावर देखील अभिमान व्यक्त करून त्यांनी लिहिले की भारतीय अंध महिला क्रिकेट संघाचे आयोजन करणे त्यांच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. राहुल यांनी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे वर्णन करताना म्हटले की हा विजय धैर्य आणि असीम शक्यतांचा संदेश आहे. त्यांनी खेळाडूंची अदम्य इच्छाशक्ती आणि लढाऊ वृत्ती ही देशासाठी प्रेरणा असल्याचे देखील म्हटले आहे. तसेच, राहील गांधीं यांनी भारताला या मुलींचा अभिमान वाटत असल्याचेही सांगितले आहे.
रविवारी, कोलंबो येथे खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळला ७ विकेटने पराभूत करत टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना नेपाळने 20 षटकांत 5 बाद 114 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल, भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत केवळ 12.1 षटकांतच लक्ष्य पूर्ण करून जेतेपदावर आपले नाव कोरले. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी बजावली.
भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत सलग विजय मिळवले आहेत, एकही सामना भारताने गमावला नाही. भारतीय संघाने स्पर्धेतील सर्व सात सामने आपल्या खिशात घातले. या काळात संघाने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, पाकिस्तान, अमेरिका आणि नेपाळ सारख्या प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली आणि जेतेपद पटकावले. उपांत्य फेरीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाचा ९ विकेटने पराभव करून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी दाखवलेल्या आत्मविश्वास आणि संयमामुळे संघ अपराजित राहून विजेता बनला.
२०२५ च्या पहिल्या अंध महिला टी-20 विश्वचषकाफहर जेतेलंड जिंकून भारताने भारतीय क्रीडा इतिहासात एक विशेष पराक्रम केला आहे. भारतीय महिला संघाने मिळवलेल्या या यशाबद्दल देशभरात उत्साह आणि अभिमानाची लाट उसळून आलेली दिसत आहे. त्यामुळे भारतीय महिला संघावर कौतुकच्चा वर्षाव होत आहे.






