
वडिलांच्या तब्येतीमुळे स्मृती मानधनाचे लग्न अचानक पुढे ढकलले! (Photo Credit - X)
वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू
लग्नापूर्वीचे इतर समारंभ आणि विधी मोठ्या उत्साहात पार पडत होते. या कार्यक्रमांचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप गाजले होते. याच दरम्यान, स्मृती मानधना यांच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याची बातमी आली. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काल (शनिवारी) हळदी आणि मेहंदीचे विधी झाले होते, तर आज दुपारी (२३ नोव्हेंबर) सांगली येथे हे दोघे विवाहबंधनात अडकणार होते. मात्र, आनंदाच्या या क्षणी त्यांच्या घरी अचानक दुःखाचे वातावरण पसरले.
VIDEO | Tuhin Mishra, manager of Indian cricketer Smriti Mandhana, confirms that her father is not well and the wedding has been indefinitely postponed. (Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/K5EVJwyR4h — Press Trust of India (@PTI_News) November 23, 2025
वडिलांच्या प्रकृतीशिवाय लग्न नाही
मीडिया रिपोर्टनुसार, स्मृती मानधना यांच्या मॅनेजरने सांगितले की, मानधना त्यांच्या वडिलांच्या खूप जवळ आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूने स्पष्ट केले आहे की, त्यांचे वडील पूर्णपणे ठीक होत नाहीत, तोपर्यंत त्या लग्न करणार नाहीत. वृत्तानुसार, मानधनाचे वडील श्रीनिवास मानधनावर सांगली येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. नाश्ता करत असताना श्रीनिवास मानधना यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ही घटना घडली. सुरुवातीला ते सामान्य वाटत असले तरी, त्यांची प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात आल्यावर, कुटुंबाने कोणताही धोका न घेता ताबडतोब रुग्णवाहिका बोलावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले.
वर्ल्ड कपमधील स्मृतीचा ऐतिहासिक फॉर्म
या घटनेमुळे काही आठवड्यांपूर्वी भारतासाठी मिळवलेला ऐतिहासिक विजय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुमारे तीन आठवड्यांपूर्वी भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी हरवले होते. भारताच्या त्या ऐतिहासिक विजयात स्मृती मानधनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. मानधनाने संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये ९ सामने खेळून ४३४ धावा केल्या होत्या. वर्ल्ड कपमध्ये तिच्या फलंदाजीचा सरासरी दर (Average) ५४.२५ होती. या कामगिरीमुळे ओडीआय (ODI) वर्ल्ड कपच्या इतिहासात १००० धावांचा टप्पा गाठण्यापासून ती केवळ ७ धावांनी दूर राहिली.