लग्नापूर्वी स्मृती आणि पलाश आपापसात भिडले(फोटो-सोशल मीडिया)
या सामन्यात केवळ जोडपेच नाही तर भारतीय महिला क्रिकेट संघातील अनेक प्रसिद्ध खेळाडूंनी देखील सहभाग नोंदवला होता. टीम ब्राइडसाठी आघाडीच्या फलंदाज शफाली वर्मा, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्ज, रेणुका सिंग, राधा यादव आणि रिचा घोष यांनी भाग घेतला होता. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिकच खास बनवला होता.
टीम ब्राइड आणि टीम ग्रूम यांच्यातील सामन्याचे वातावरण हलकेफुलके आणि चैतन्यशील दिसून आले. हा लग्नापूर्वीचा सामना उत्साहाने, हास्याने आणि मजेने खेळवण्यात आला. या सामन्यात टीम ब्राइडने दमदार विजय मिळवला. या सामन्यातील विजयानंतरचा आनंद जास्त वेळ लपून राहिला नाही तर सोशल मीडियावर लवकरच व्हायरल झाला. स्टंप उचलणे, नाचणे आणि आनंदाची झलक प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसत आहे.
सामना संपल्यानंतर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांनी मध्यभागी येऊन भेट घेतली आणि हस्तांदोलन केले, तसेच मिठी देखील मारली. सामन्यानंतरचा हा एक हृदयस्पर्शी क्षण असल्याचे बोलले जात आहे. जो त्यांच्या मैत्री, प्रेम आणि समजुतीचे स्पष्ट प्रतिबिंब दाखवणारे असे होते.
हेही वाचा : NZ vs WI : न्यूझीलंड दौऱ्यासाठी वेस्ट विंडीज कसोटी संघाची घोषणा! ‘या’ खेळाडूचे पुनरागमन
टीम ब्राइड आणि टीम ग्रूम यांच्यातील सामना हा त्यांच्या लग्नापूर्वीच्या उत्सवांचा एक भाग होता, जो केवळ त्यांचे नातेच नाही तर त्यांची मैत्री, मजा आणि स्वप्ने देखील स्पष्ट करतो. त्यांच्या आयुष्यातील हा नवीन टप्पा प्रेम, विश्वास आणि सामायिक स्वप्नांकडे त्यांच्या प्रवासाची सुरुवात आहे.






