Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s T20 World Cup 2024 : दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड कोण होणार विश्वविजेता?

आता आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये महामुकाबला होणार आहे. या सामन्यानंतर आज जगाला नवा विश्वविजेता संघ मिळणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 20, 2024 | 08:22 AM
फोटो सौजन्य - ICC

फोटो सौजन्य - ICC

Follow Us
Close
Follow Us:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड : महिला T२० विश्वचषक २०२४ चा आज अंतिम सामान रंगणार आहे. या सामन्याचे आयोजन दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर करण्यात आले आहे. त्यामुळे आज जगाला नवा चॅम्पियन मिळणार आहे. दक्षिण आफ्रिका संघाची विश्वचषकातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यत संघाला फक्त एक सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला इंग्लंड विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. तर त्यानंतर त्यांनी साखळी सामन्यांमध्ये बांग्लादेश, स्कॉटलंड आणि वेस्ट इंडिजच्या संघाचा पराभव केला होता. त्याचबरोबर उपांत्य फेरीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विश्वचषकामध्ये एकही सामना न गमावलेला संघ ऑस्ट्रेलियाचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

न्यूझीलंड संघाची T२० विश्वचषक २०२४ मधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर संघाने आतापर्यत सांखळी सामन्यांमध्ये एक सामना गमावलेला आहे. न्यूझीलंडच्या संघाला ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं होते. तर न्यूझीलंडने भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघाला पराभूत करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. आता दोन्ही संघानी साखळी सामन्यांमध्ये एक-एक सामना गमवावा लागला आहे. आता आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये महामुकाबला होणार आहे. या सामन्यानंतर आज जगाला नवा विश्वविजेता संघ मिळणार आहे.

Two teams, one #T20WorldCup trophy 🏆 Who etches their name in the history books? pic.twitter.com/v0Hj4xvVTd — ICC (@ICC) October 20, 2024

न्यूझीलंडच्या महिला संघाने 2000 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता परंतु त्या ऐतिहासिक विजयात किवींनी चांगली कामगिरी केली होती. महिला T20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंड संघ सलग दहा सामने हरला होता. पण त्यानंतर त्यांनी विश्वचषकामध्ये कमालीची कामगिरी केली आहे, दोन्ही संघ क्रिकेट विश्वामधील मजबूत संघ आहेत त्यामुळे कोणता संघ आज विश्वविजेता होणार हे सांगणं कठीण आहे.

विश्वचषकातील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघ :

लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताजमिन ब्रिट्स, ॲनेके बॉश, क्लो ट्रायॉन, मारिजने कॅप, सुने लुस, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका, तुमी सेखुखने. अयांदा हलुबी, शेषानी नायडू, मिके डी रिडर.

विश्वचषकातील अंतिम सामन्यात न्यूझीलंड महिला संघ :

सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास, मॉली पेनफोल्ड, जेस केर, हॅना रोवे, लेह कास्परेक.

Web Title: South africa vs new zealand who will win the womens t20 world cup 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2024 | 08:17 AM

Topics:  

  • cricket
  • T20 World Cup 2024

संबंधित बातम्या

IPL 2026 : ‘तो कसा खेळतोय…’, वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून रियान पराग थक्क, पत्रकार परिषदेमध्ये केले मोठे विधान
1

IPL 2026 : ‘तो कसा खेळतोय…’, वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून रियान पराग थक्क, पत्रकार परिषदेमध्ये केले मोठे विधान

PSL 2026 : नसीम शाह याला 2 कोटी रुपयांचा दंड, पीसीबीने केली कारवाई! मरियम नवाज हिला ‘राणी’ म्हणणे पडले महागात
2

PSL 2026 : नसीम शाह याला 2 कोटी रुपयांचा दंड, पीसीबीने केली कारवाई! मरियम नवाज हिला ‘राणी’ म्हणणे पडले महागात

Hardik Pandya ची गर्लफ्रेंड महिका शर्मा मुलगा अगस्त्यासाठी पापाराझींवर संतापली! सोशल मिडियावर Video viral
3

Hardik Pandya ची गर्लफ्रेंड महिका शर्मा मुलगा अगस्त्यासाठी पापाराझींवर संतापली! सोशल मिडियावर Video viral

RR vs CSK Match Preview : संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा करणार जुन्या संघाचा सामना, चेन्नई संघ एमएस धोनीशिवाय उतरणार मैदानात
4

RR vs CSK Match Preview : संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा करणार जुन्या संघाचा सामना, चेन्नई संघ एमएस धोनीशिवाय उतरणार मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.