Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

David Warner : बॉल टॅम्परिंग प्रकरण पुन्हा चर्चेत; वॉर्नर ख्वाजाच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ मैदानात

David Warner : 2018 च्या बॉल टॅम्परिंग प्रकरणावर उस्मान ख्वाजाच्या विधानाला डेव्हिड वॉर्नरचा पाठिंबा. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या चौकशी प्रक्रियेवर वॉर्नरने उपस्थित केले गंभीर प्रश्न.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 09, 2026 | 03:35 PM
David Warner : बॉल टॅम्परिंग प्रकरण पुन्हा चर्चेत; वॉर्नर ख्वाजाच्या समर्थनार्थ मैदानात

David Warner : बॉल टॅम्परिंग प्रकरण पुन्हा चर्चेत; वॉर्नर ख्वाजाच्या समर्थनार्थ मैदानात

Follow Us
Follow Us:
  • क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या तपासावर उपस्थित केले प्रश्न
  • आठ वर्षांनंतर नव्या खुलाशांनी वादाला पुन्हा तोंड
  • कुटुंबीयांशी बोलणेही झाले कठीण
 

2018 मधील बॉल टॅम्परिंग प्रकरणाला 8 वर्षांनंतर पुन्हा उजाळा मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) उस्मान ख्वाजाच्या विधानाला ठाम समर्थन दिले आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या तपास प्रक्रियेवरही टीका केली आहे.

वॉर्नरने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ख्वाजाच्या भूमिकेचे समर्थन केले. ‘काही गोष्टी क्रिकेटपेक्षाही मोठ्या असतात. जुन्या जखमा पुन्हा उघडण्याचा हा विषय नाही, तर त्या जखमा कधीच पूर्णपणे भरल्या नाहीत, हे मान्य करण्याचा आहे. मी माझा भाऊ उस्मान ख्वाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे,’ असे त्याने म्हटले आहे.

सत्य मांडण्यासाठी धैर्य लागते. विशेषतः जेव्हा लोक तुम्हाला गप्प राहण्यास सांगत असतात, अशा वेळी आपली बाजू मांडणे महत्त्वाचे असते. वेळ निघून गेल्याने उत्तरदायित्व संपत नाही आणि प्रश्न विचारणे म्हणजे वैयक्तिक वैर नव्हे, असेही वॉर्नरने स्पष्ट केले.

ख्वाजाने आठ वर्षांनंतर या प्रकरणाबाबत आपली भूमिका मांडली आहे. त्याच्या विधानावर टीका करण्याऐवजी चौकशी करणाऱ्यांना जाब विचारला पाहिजे, असे वॉर्नरने म्हटले. ‘ख्वाजाने जे सांगितले ते 100 टक्के खरे आहे. त्याने त्या दिवसापासून घडलेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवली आहे. त्याने आपली कहाणी सांगितली, त्याबद्दल त्याचे आभार,’ असेही वॉर्नर म्हणाला.

चौकशी प्रक्रियेवर उपस्थित केले प्रश्न

या प्रकरणाच्या चौकशी प्रक्रियेवरही वॉर्नरने गंभीर प्रश्न उपस्थित केले. उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांच्याशी संबंधित मुलाखत प्रक्रियेत त्रुटी असल्याचा दावा त्याने केला. बॅनक्रॉफ्टच्या शेजारी ख्वाजा उपस्थित असतानाही त्याची अधिकृत मुलाखत घेण्यात आली नव्हती. मग ही संपूर्ण चौकशी कशी मानायची, असा सवाल वॉर्नरने उपस्थित केला.

चौकशी पारदर्शक आणि जबाबदारी निश्चित करणारी असायला हवी. एखाद्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारण्याऐवजी चौकशीसाठी जबाबदार असलेल्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे, असेही त्याने सांगितले.

IND Vs NZ: ‘हिटमॅन’चा रुबाबाच भारी! केवळ इतके सिक्स अन् Rohit च्या नावावर होणार ‘हा’ महारेकॉर्ड

कुटुंबीयांशी बोलणेही झाले कठीण

या प्रकरणामुळे आपल्या कुटुंबावरही भावनिक परिणाम झाल्याचे वॉर्नरने सांगितले. ख्वाजाच्या नव्या विधानानंतर आपल्या मुलींना 2018 मधील घटनांबाबत स्पष्टीकरण देणे कठीण झाले. विशेषतः 12 वर्षांच्या मुलीने त्या वेळी मैदानावर नेमके काय घडले होते, इतके कॅमेरे का होते आणि खेळाडू दूरचित्रवाणीवर का रडत होते, असे प्रश्न विचारल्याचे त्याने सांगितले.
‘मुलींनो, नेहमी सत्य बोला. कारण खोटे कधी ना कधी बाहेर येतेच,’ असा सल्ला आपण मुलींना दिल्याचेही वॉर्नरने नमूद केले.

युवा खेळाडूंसाठी मोठी संधी! Khelo India Youth Games 2026 ची घोषणा; तब्बल 6000 खेळाडू अन्…

नेमके काय होते बॉल टॅम्परिंग प्रकरण?

2018 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात केपटाऊन येथे झालेल्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंगचा प्रकार उघडकीस आला होता. ऑस्ट्रेलियाचा तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि फलंदाज कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांची नावे या प्रकरणात समोर आली होती. चेंडूची स्थिती बदलण्यासाठी सँडपेपरचा वापर केल्याचे आढळले होते.

या घटनेनंतर वॉर्नर, स्मिथ आणि बॅनक्रॉफ्ट यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता आठ वर्षांनंतर उस्मान ख्वाजाने या प्रकरणाची माहिती संपूर्ण संघाला होती, असा दावा केल्याने हा जुना वाद पुन्हा चर्चेत आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बॉल टॅम्परिंग प्रकरणात डेव्हिड वॉर्नरने कोणाला पाठिंबा दिला?

    Ans: डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा याला पाठिंबा दिला.

  • Que: बॉल टॅम्परिंग प्रकरण कधी घडले होते?

    Ans: 2018 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात केपटाऊन येथे झालेल्या कसोटी सामन्यात हा प्रकार घडला होता.

  • Que: बॉल टॅम्परिंग प्रकरणात कोणत्या खेळाडूंची नावे समोर आली होती?

    Ans: स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांची नावे या प्रकरणात समोर आली होती.

Web Title: David warner supports usman khawaja ball tampering scandal rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • Australia
  • cricket
  • Usman Khawaja

संबंधित बातम्या

बोंबला! Usman Khawaja ने ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे वाभाडे? Ball Tampering प्रकरणात म्हणाला, ‘खेळाडूंनाच नाही, तर…’
1

बोंबला! Usman Khawaja ने ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे वाभाडे? Ball Tampering प्रकरणात म्हणाला, ‘खेळाडूंनाच नाही, तर…’

Chris Lynn : कोकेन सेवनप्रकरणी बंदी संपली; ख्रिस लिन BBLमध्ये खेळण्यास सज्ज !
2

Chris Lynn : कोकेन सेवनप्रकरणी बंदी संपली; ख्रिस लिन BBLमध्ये खेळण्यास सज्ज !

QUAD : भारतासह चार देशांची मोठी रणनीती! AI, महत्त्वपूर्ण खनिजे आणि समुद्री सुरक्षेसाठी करणार सहकार्य
3

QUAD : भारतासह चार देशांची मोठी रणनीती! AI, महत्त्वपूर्ण खनिजे आणि समुद्री सुरक्षेसाठी करणार सहकार्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.