SRH vs CSK: Great dance at Chepauk! The umpire stopped the game as soon as Ravindra Jadeja entered the field, what happened next.. Watch VIDEO
SRH vs CSK : आयपीएल २०२५ चा ४३ वा सामना काल (२४ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायर्स हैदराबाद यांच्यात रंगला होता. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैद्राबादने चेन्नईला पराभूत केले. हैद्राबादचा कर्णधार पॅट कमीन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी बोलवण्यात आले. चेन्नईला प्रथम फलंदाजी करताना १५३ धावांच करता आल्या. प्रतिउत्तरात हैदराबादने १९ व्या षटकात 154 धावांचे लक्ष्य पूर्ण करून सुपर किंग्सचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला. या सामान्यादरम्यान एक घटना घडली, ज्यामुळे खेळ थांबवावा लागला. या सामन्यात रवींद्र जडेजा फलंदाजीसाठी आला तेव्हा पंचांनी त्याला थांबवले होते.
खरं तर, जडेजाची बॅट पंचांच्या चाचणीत पास होऊ शकली नाही. त्यानंतर त्याला त्याची बॅट बदलवून घ्यावी लागली. पाचव्या षटकात सॅम करन बाद झाल्यानंतर जडेजा फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा हा प्रकार घडला. या संपूर्ण प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा : SRH vs CSK : CSK विरुद्ध Mohammad Shami ची विक्रमाला गवसणी, असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज
व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की, जडेजा फलंदाजीसाठी मैदानात येताच, मैदानावरील पंचांनी स्टँडर्ड बॅट गेज वापरून त्याच्या बॅटची तपासणी करण्यासाठी काही काळ खेळ थांबवला होता. ज्यामुळे पंचांनी त्याला दुसरी बॅट मागवायला लावली. खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी सीएसके डगआउटमधून ताबोडतोब एक नवीन बॅट मागवण्यात आली. या सामन्यात जडेजा सामन्यात काही विशेष करू शकला नाही. तो केवळ २१ धावा करून माघारी परतला.
@RamiReddyHere07 pic.twitter.com/7gaiKWk5Qi
— WalterWhiteBabai (@TeaTaguthava) April 25, 2025
हेही वाचा :PSL 2025 : पाकिस्तान सुपर लीगला मोठा झटका! Pahalgam Terror Attack नंतर भारतातील प्रसारणावर बंदी..
काल (२४ एप्रिल) आयपीएलचा ४३ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आला. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात हैद्राबादने चेन्नईला पराभवाची धूळ चारली. हैद्राबादच्या संघाकडून नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी बोलवण्यात आले. चेन्नईला प्रथम फलंदाजी करताना १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रतिउत्तरात हैदराबादने हे लक्ष्य १९ व्या षटकात पूर्ण केले आणि सुपर किंग्सचा 5 विकेट्सने पराभव केला. हैदराबादच्या विजयात इशान किशन आणि अनिकेत वर्मा यांनी महत्वाची भूमिका वठवली आहे. आयपीएल २०२५ मधील ९ सामन्यात चेन्नईला ७ सामन्यात पराभव तर केवळ २ सामन्यात विजय प्राप्त करता आला आहे. या पराभवाने चेन्नई गुणतालिकेत अगदी तळाला जाऊन पोहचली आहे. तर हैद्राबादची स्थिति काही चांगली नाही, ते ९ सामन्यात केवळ तीनच विजय मिळवू शकले.