पाकिस्तान सुपर लीग(फोटो-सोशल मिडिया)
PSL 2025 : पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेच्या निषेधार्थ भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानच्या काही डिजिटल आणि प्रसारमाध्यमांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२५ च्या भारतातील प्रसारणावर बंदी घालण्याचा समावेश आहे. जो पाकिस्तानसाठी मोठा झटका आहे. ही बंदी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि सावजनिक भावनांचा विचार करून लागू करण्यात आली आहे.
पाकिस्तान सुपर लीग ही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आयोजित टी-२० क्रिकेट स्पर्धा आहे. या स्पर्धेचे भारतातील लाइव्ह प्रसारण आणि ऑनलाइन स्ट्रीमिंगवर सरकारने बंदी घातली आहे. यामागचे कारण म्हणजे भारत-पाकिस्तानमधील वाढता राजनैतिक तणाव आणि दहशतवादी हल्ल्याला प्रतिसाद म्हणून पाकिस्तानशी संबंधित सांस्कृतिक आणि क्रीडा प्रसारण रोखणे. भारताचा पीसीबीला दणका आता बंदी घातल्यामुळे पीसीबीला आंतरराष्ट्रीय प्रसारणातून मिळणारा नफा कमी होऊ शकतो, कारण भारत ही क्रिकेटसाठी मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जातो. त्यामुळे आता त्यांना पीएसएलच्या प्रसारणातून मिळणारा महसूल, विशेषतः भारतीय बाजारपेठेतून, कमी होईल. फॅनकोड आणि इतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सना याचा फटका बसू शकतो. तसेच पीएसएल आणि संबंधित प्रसारण कंपन्यांना आर्थिक नुकसान होऊ शकते.
हेही वाचा : SRH vs CSK : CSK विरुद्ध Mohammad Shami ची विक्रमाला गवसणी, असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज
काल (२४ एप्रिल) आयपीएलचा ४३ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आला. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात हैद्राबादने चेन्नईला पराभवाची धूळ चारली. हैद्राबादच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चेन्नईला प्रथम फलंदाजी करताना १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रतिउत्तरात हैदराबादने १९ व्या षटकात 154 धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि सुपर किंग्सचा 5 विकेट्सने पराभव केला. हैदराबादच्या विजयात इशान किशन आणि अनिकेत वर्मा यांनी महत्वाची भूमिका वठवली आहे. आयपीएल २०२५ मधील ९ सामन्यात चेन्नईला ७ सामन्यात पराभव तर केवळ २ सामन्यात विजय प्राप्त करता आला आहे. या पराभवाने चेन्नई गुणतालिकेत अगदी तळाला पोहचली आहे. तर हैद्राबादला ९ सामन्यात केवळ तीनच विजय मिळाले आहेत.