फोटो सौजन्य - Delhi Capitals/SunRisers Hyderabad
Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals Toss Update : सनराइझर्स हैदराबाद विरूध्द दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यामध्ये सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यात दिल्लीच्या संघाला कमबॅक करण्याची संधी आहे. या सामन्यात सनराइझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना दिल्लीच्या संघासाठी महत्वाचा असणार आहे. दिल्लीच्या संघाला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. जर आजच्या सामन्यात दिल्लीचा संघाचा पराभव झाला तर संघाच्या अडचणीमध्ये वाढ होईल.
दिल्ली कॅपिट्ल्सच्या संघामध्ये आजच्या सामन्यात मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये मुकेश कुमार याला प्लेइंग इलेव्हनमधुन बाहेर केले आहे त्याच्या जागेवर टी नटराजनला आयपीएलचा पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघामध्ये मोहम्मद शमीला प्लेइंग इलेव्हनमधुन बाहेर केले आहे.
🚨 Toss 🚨@SunRisers won the toss and chose to bowl first against @DelhiCapitals
Updates ▶ https://t.co/1MkIwk4VNE#TATAIPL | #SRHvDC pic.twitter.com/ni0fhqLSJg
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2025
सनराइझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेमध्ये नवव्या स्थानावर आहे. संघाने आतापर्यत फक्त 10 पैकी 3 सामन्यात विजय मिळवता आला आहे, तर 7 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्ली कॅपिट्ल्सचा संघ पॅाइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे, दिल्ली कॅपिट्ल्सच्या संघाने 10 सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना 6 सामन्यात विजय मिळाला आहे तर 4 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.
ICC Team Ranking : एकदिवसीय आणि टी-२० मध्ये भारताचे वर्चस्व, कसोटीत भारताचा संघ दगमगला
मागील सामन्यात अभिषेक शर्मा याने चांगली खेळी खेळली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्या कामगिरीवर चाहत्याचे लक्ष असणार आहे. फाफ डूप्लेसिने कमालीची कामगिरी आतापर्यत केली आहे, आज तो कशी कामगिरी करेल हे पाहणे मनोरंजक ठरेल. हैदराबादच्या संघामध्ये नितीश कुमार रेड्डीला बाहेर केले आहे, त्याच्या जागेवर सचिन बेबीला संघामध्ये घेतले आहे. आज पदार्पण करणारा सचिन बेबी कशी कामगिरी करेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.
फाफ डूप्लेसि, अभिषेक पोरेल (विकेटकिपर), केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), विपराज निगम, ट्रिस्टन स्टब्स, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, करुण नायर, दुष्मंथा चमीरा, टी नटराजन.
अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), सचीन बेबी, अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, जीशान अन्सारी, ईशान मलिंगा